Header Ads Widget

*शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर भूषण काटे यांच्या शुभहस्ते जनता हायस्कूल मध्ये श्रीं ची आरती.*

    शिंदखेडा येथील जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व गायत्री माता प्री प्रायमरी सीबीएससी स्कूल मध्ये सहाव्या दिवसाची श्री गणेशांची आरती शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ भुषण काटे यांच्या शुभहस्ते  करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य श्री एस एस पाटील पर्यवेक्षक श्री बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक श्री एस के जाधव श्री एस ए पाटील श्री डी एच सोनवणे श्री ए.टी.पाटील गणेश उत्सव समिती प्रमुख श्री एम डब्ल्यू तमखाने ज्येष्ठ लिपिक श्री किशोर गोरख पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
   याप्रसंगी  विद्यार्थ्यांनी जीवनात जीवन जगत असताना निर्व्यसनी व आरोग्यदायी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा असा मोलाचा सल्ला व मार्गदर्शन केले.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील तर मान्यवरांचे आभार श्री ए टी पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments