दोंडाईचा : यंदाच्या गणेशोत्सवात अनेक मंडळ आणि घरगुती गणपती बाप्पा समोर ऐतिहासिक प्रंसग,पुरातन मंदिर, ऑपरेशन सिंदूर, पर्यावरणाचा संदेश देणारे अनेक देखावे साकारण्यात आले आहेत. दोंडाईचा कोठारी पार्क येथील तरुण जयकिशन बांटुगे यांनी त्यांच्या घरच्या श्री गणपती बाप्पा समोर राजस्थान येथील प्रसिद्ध श्री खाटू श्याम बाबा मंदिर चे तोरण द्वार हुबेहूब साकारले आहे पुर्णपणे टाकाऊ पुठ्यांपासून तयार केलेल्या तोरणव्दाराला हुबेहूब सोनेरी कलरची रंगरंगोटी केली आहे.मंदिराचे तोरणव्दार तयार करण्यासाठी जयकिशन या तरूणाला तब्बल 25 दिवस लागले.
राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात स्थीत खाटू श्याम मंदिर हे खातू शहरात असलेले एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर 1000 वर्षांहून जुने आहे या मंदिराचा इतिहास महाभारतकाळाशी जोडला गेलेला आहे म्हणून खाटू श्याम बाबांना कलयुगातील एक देव म्हणून मानले जाते खाटू श्याम हे महाभारतातील बर्बरीक यांचे प्रकटीकरण मानले जाते ज्यांना भगवान श्रीकृष्णाने कलयुगात श्याम म्हणून पूजा केली जाईल असे वरदान दिले होते.याच मंदिराचे तोरणव्दार जयकिशन बांटुगे यांनी आपल्या कलेकृतीतून तब्बल 25 दिवसांचा कालावधीत पुर्ण केले. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जयकिशन बांटुगे हे पेंटीग काम करतात या देखाव्यामुळे स्थानिक कलाकारांच्या मेहनतीला प्रोत्साहन मिळते .
*आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा*
0 Comments