शिंदखेडा शिक्षण विभाग पंचायत समिती शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघ तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ तसेच शैक्षणिक संकुल शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने 46 व्या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शिंदखेडा येथील एन डी मराठे हायस्कूल येथे करण्यात आले.
कार्यक्रमात मान्यवरांचे लेझीम पथक व ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले तसेच कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व द्विप्रजालन करण्यात आले.
आजचे विद्यार्थी हेच उद्याचे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्यातील कल्पकता देशाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाईल असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित तालुक्याचे भाग्यविधाते तसेच उद्योजक सरकार महर्षी श्री सरकार साहेब रावल यांनी कार्यक्रम प्रसंगी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री साहेबराव मराठे तर प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी श्री आर एम नेतनराव गटशिक्षणाधिकारी श्री डी एस सोनवणे आगार व्यवस्थापक श्री योगेश्वर शिवदे शिक्षण विस्तार अधिकारी शैलाजा शिंदे श्री एस पी चौधरी केंद्रप्रमुख श्री कैलास शिंदे तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री एम डी पाटील श्री के वी बाविस्कर श्री एस एस गोसावी श्री जे डी भदाणे विज्ञान व गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री सुधाकर माळी उपाध्यक्ष श्री एन एम पाटील श्री बी पी देवरे विज्ञान संघ सचिव ए टी पाटील कार्याध्यक्ष श्री आर ए चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते
या प्रदर्शनास तालुक्यातील एकूण 149 उपकरण मांडण्यात आले.यात प्राथमिक गट 77 माध्यमिक गट 49 दिव्यांग विद्यार्थी गट 06 यांसह शिक्षक गटातून 16 यासह लॅब टेक्निशियन गटातून 3 उपकरणांची मांडणी करण्यात आली.
सदर प्रदर्शन हे शिंदखेडा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री डी एस सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तर शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघ विज्ञान अध्यापक संघ व एन डी मराठे हायस्कूल शिंदखेडा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजात करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुधाकर माळी यांनी तर सूत्रसंचालन उपशिक्षक श्री एन एस सोनवणे व मान्यवरांचे आभार श्री ए टी पाटील यांनी मानले.
0 Comments