(विद्यार्थ्यांमध्ये कल्पनाशक्ती व कौशल्य विकास घडवण्याचे कार्य विज्ञान शिक्षक करतात. ज्येष्ठ अधिव्याख्याते जे एस पाटील)
शिंदखेडा येथील एन डी मराठे हायस्कूल येथे 46 व्या तालुका विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ धुळे डायट चे अधिव्याख्याते डॉक्टर जे एस पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री साहेबराव मराठे हे होते कार्यक्रम प्रसंगी गटशिक्षणाधिकारी अधिकारी श्री डी एस सोनवणे रोटरी क्लब सचिव
अमरदीप गिरासे प्रा.गोपाल परमार सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चौधरी जिल्हा मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष के व्ही बाविस्कर ,शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री एस ए कदम सचिव श्री एम डी पाटील केंद्रप्रमुख श्री कैलास शिंदे तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष सुधाकर माळी श्री एस एस गोसावी श्री जे डी भदाणे विज्ञान संघ सचिव श्री ए टी पाटील उपाध्यक्ष श्री एन एम पाटील कार्याध्यक्ष श्री आर ए चित्ते शाळेचे मुख्याध्यापक श्री अमोल मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी पारितोषिक वितरणात प्रथमिक गट
प्रथम आयुष्यमान चेतन बच्छाव रोटरी इंग्लिश स्कूल दोंडाईचा (प्लास्टिक रोड)
द्वितीय - ऊर्जाली न्यानेश्वर पाटील हस्ती वर्ल्ड स्कूल दोंडाईचा (जलसंवर्धन आणि व्यवस्थापन )
तृतीय - आयन गुलाम सर्वद जी.प उर्दू शाळा 2 नरडाणा (इंटिग्रेटेड स्मार्ट सेफ्टी अँड सिक्युरिटी सिस्टीम)
उत्तेजनार्थ - रोशनी अनिल चौधरी मीराबाई गर्ल्स हायस्कूल शिंदखेडा (सेवेज ट्रीटमेंट प्लँट )
दिव्यांग प्राथमिक गट
प्रथम - दर्शन विजय धनगर एन डी मराठे हायस्कूल शिंदखेडा (फायर अलार्म )
माध्यमिक गट
प्रथम- वेदांतिका जयपाल गिरासे ( रिव्हर क्लिनिग बोट) आर डी एम पी कॉलेज दोंडाईचा
द्वितीय- दर्शन जिजाबराव कोळी ( जीव संरक्षक बोट) गो सो देवकर विद्यालय विरदेल
तृतीय- रोहित हिंमत आखाडे (हरित ऊर्जा ) माध्यमिक आश्रम शाळा रेवाडी
उत्तेजनार्थ - रिता रोहिदास पावरा (शाश्वत शेती ) आदिवासी आश्रम शाळा विखरन
दिव्यांग माध्यमिक गट
साई भगवान कुवर (उदयोन्मुख तंत्रज्ञान ) गो सो देवकर विद्यालय विरदेल
शैक्षणिक साहित्य प्राथमिक गट प्रथम- महेश अशोक बाविस्कर (मनोरंजक गणितीय मॉडेल) गुरुदत हायस्कूल वायपुर
उत्तेजनार्थ 1) हर्षल देविदास कापुरे (संतुलित आहार) एन डी मराठे हायस्कूल शिंदखेडा)
2) शे.वसीमुद्दीन प्यारद्दीन ( गणितीय जादू पेटी)
शैक्षणिक साहित्य माध्यमिक गट ,प्रथम - विजय भाऊराव जाधव (मॅजिक बोर्ड) स्वामी समर्थ विद्यालय शिंदखेडा
उत्तेजनार्थ 1) जतिन देवेंद्र बोरसे (जलसंवर्धन व व्यवस्थापन )जनता हायस्कूल शिंदखेडा
2) राजेंद्र भटू पाटील (बहुंऊदेशीय भौमितिक उपकरणे )महात्मा गांधी विद्यालय दराने रोहाने
शैक्षणिक साहित्यप्रयोग शाळा परिचर गट
प्रथम- विजय मधुकर चौधरी ( शैक्षणिक साधने) हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा
उत्तेजनार्थ - रविंद्र मुरलीधर कोळी(प्रकाशाचे परिवर्तन )
या प्रसंगी कार्यक्रमाचे औचित्य साधून पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्याकडून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण व तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण ही करण्यात आले.
सदर विज्ञान प्रदर्शनामध्ये तज्ञ परीक्षक म्हणून प्राथमिक गटात श्री पी आर पाटील, श्री एस बी सैंदाणे श्री एन एम पाटील यांनी तर माध्यमिक गटातून श्री व्ही आर आहिरे श्री एन एन पाटील श्री ए पी चंद्रा यांनी काम पाहिले तसेच आर्यन अरुण पाटील या विद्यार्थीने विद्यार्थीमनोगत तर श्री विजय जाधव यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एन एस सोनवणे,श्री सुधाकर माळी यांनी तर मान्यवरांचे आभार विज्ञान संघ सचिव श्री अतुल पाटील यांनी मानले.
0 Comments