प्रतिनिधी l शिंदखेडा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळामार्फत शिंदखेडा परिसरातील शेतकऱ्यांसाठी विजेचा रात्रीचा दिलेला वेळ बदलून दिवसा करणे बाबत भारतीय जनता पार्टी शिंदखेडा यांच्यामार्फत कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी,शाखा शिंदखेडा यांना दिनांक २६ डिसेंबर शुक्रवार रोजी
सकाळी अकरा वाजता कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अभियंता अनुपस्थित असल्यामुळे सहाय्यक अभियंता भावेश तेटू यांना निवेदन दिले.त्यांत शेतकऱ्यांसाठी दिलेल्या शेतीच्या विजेचा कालावधी संध्याकाळी आठ ते पहाटे पाच असा असून तो शेतकऱ्यांसाठी अतिशय त्रासदायक आहे.पहिले दिवसाचा वेळ दिला व नंतर बदल करून शेतकऱ्यांची फरफट का करीत आहेत...? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी व्यक्त केला.वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये बिबट्यांचा वाढलेला वावर तसेच रात्रीच्या वेळी वाढलेली थंडी अशा निरनिळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देणे अतिशय कष्टदायक व त्रासाचे झाले असून शेती कशी कसावी या विवंचनेत शेतकरी बांधव आहे. विजयपाई हातातील हंगाम निसटून जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.त्यामुळे ती वेळ तात्काळ बदलून सकाळच्या सत्रात दिल्यास शेतीची कामे सहजपणे शेतकऱ्यांना करता येतील. शेती टिकली तर मनुष्य टिकेल ही भावना शेतकऱ्यांची असून त्या भावनेचा आपण आदर करावा आणि रात्रीची वेळ बदलून दयावी. अन्यथा तसें न झाल्यास पुढील पाच दिवकसात महाराष्ट्र राज्य वितरण महामंडळ कार्यालयावर कार्यकारी अभियंता यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांचे मोठे जनआंदोलन काढण्यात येईल व त्याचे होणारे परिणामास अधिकारी स्वतः व कार्यालय जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अशी तंबी देण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी संजयकुमार महाजन, अँड विनोद पाटील,माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील,दादा मराठे,कुणाल पाटील, ज्ञानेश्वर सकट,गुलाब सोनवणे, पंडीत माळी,श्याम सोनवणे, राजाराम सोनवणे,सुकदेव सोनवणे आदी यांची उपस्थिती होती.
0 Comments