Header Ads Widget

*तमाम तलाठी व मंडळ अधिकारी यांचे नवे लॅपटॅप व उपकरणे बदलून मिळत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन*

मालपूर प्रतिनिधी. प्रभाकर आडगाळे.
 
मालपूर व परिसरातील सर्व खातेदार बंधूंना नम्र विनंती. मी मालपूर सजा तलाठी नारायण मांजलकर कडून विनंती करतो की राज्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी तलाठी ) यांना ऑनलाईन कामकाज करण्यासाठी वापरात असलेले लॅपटॉप व प्रिंटर स्कॅनर पुर्णता जिर्ण झाले आहेत ही उपकरणे तातडीने बदलून नवीन क्षमतेचे लॅपटॉप, प्रिंटर स्कॅनर उपलब्ध करून मिळेपर्यंत कामबंद आंदोलन करीत आहोत शासनाकडे महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने अनेक वेळा पाठपुरावा करून अद्यापही शासनाने लक्ष . दिले नाही फक्त आश्वासना ची गाजर दाखवली त त्यासाठी सबब महसूल ग्राम अधिकारी तलाठी संपावर जात आहेत. आज दिनांक15/12/2025 पासून कामावर बहिष्कार टाकत आहोत या बहिषकाश मुळे7/12,8अ उतारे वितरण प्रणाली, ई पिकपहाणी, ई, फेरफार प्रणाली इत्यादी बाबींवर परिणाम होणार असून. 
महाराष्ट् राज्य तलाठी संघ तमाम शेतकरी बांधवांची दिलगीरी व्यक्त करीत आहेत आमच्या ह्या सार्थ मागणी कडे आपली साथ हवी आहे. 
 
कळावे तलाठी मालपूर सजा.

Post a Comment

0 Comments