बेभरोसे हाँटेलचे मालक , सामाजिक, धार्मिक क्षेत्रात सुपरिचित असलेले भिमलिंग शिवलिंग लिंभारे यांची *जायँट्स वेलफेयर फौंडेशन, फेडरेशन 2अ च्या 2026 साठी अध्यक्ष* पदावर निवड झाल्यामुळे ग्रुप तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला,20 डिसेंबर रोजी त्यांना मथुरा येथे जायँट्स च्या वार्षिक संमेलन मध्ये अध्यक्ष पदाची शपथ दिली जाणार असून त्या साठी जायँट्स परिवार चे सदस्य मोठया संख्येने मथुरा साठी रवाना होणार आहेत, जायँट्स परिवार दोंडाईचा साठी हा खूप मोठा बहुमान असल्यामुळे सर्वांनी त्यांच्या निवडीचे कौतुक करून त्यांना त्यांच्या कार्यकाळासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या, या प्रसंगी फेडरेशन चे माजी अध्यक्ष चंद्रकांत जाधव, ग्रुप चे अध्यक्ष पंकज गिरासे, फेडरेशन ऑफिसर सुनील शिंदे, ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष रविंद्र टाटिया सर, ग्रुप चे माजी अध्यक्ष संजय श्रॉफ, ग्रुप चे पदाधिकारी देवेंद्र गिरासे, डॉ. मनिष गिरासे इत्यादी उपस्थित होते.
0 Comments