Header Ads Widget

बेटावद येथे श्री विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा प्रारंभ१६ डिसेंबरला काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचा मुख्य सोहळा



बेटावद प्रतिनिधी 

बेटावद येथे माळी वाडा विठ्ठल मंदिर चौकात भगवान पांडुरंग श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा प्रारंभ ९ डिसेंबर २०२५ पासून अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे
 सप्ताह काळात विविध कीर्तनकार महाराज आणि भजनी मंडळी हरिभक्तांना अध्यात्मिक ज्ञान, तसेच भक्ती परंपरेचे महत्त्व सांगून मार्गदर्शन करणार आहेत
रोज सकाळी काकड आरती, दिंडी आणि हरिपाठ तर 
 संध्याकाळी भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

सप्ताहाचा मुख्य सोहळा मंगळवार, दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे सकाळी ९ ते ११ या वेळेत काल्याचे कीर्तन पार पडणार आहे कीर्तनानंतर सर्व भक्तांसाठी दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
या दिवशी मोठ्या संख्येने गावकरी आणि भक्तांनी उपस्थित राहून श्री विठ्ठल कृपेचा व अध्यात्मिक लाभाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे 
या धार्मिक सप्ताहाचे आयोजन समाज सुधारक श्री सावता माळी मंडळ, महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवाभावी मंडळ, तसेच समस्त ग्रामस्थ मंडळ, बेटावद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
आयोजकांनी आवाहन केले आहे की, भक्तांनी सप्ताहभर चालणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होऊन श्री विठ्ठल कृपेचा लाभ घ्यावा.

Post a Comment

0 Comments