शिरपूर | प्रतिनिधी
दिनांक १९ रोजी श्रीनगर येथील गाडगेबाबा उद्यान, शिरपूर येथे राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांची ६९ वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व श्रद्धेने साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम महाराष्ट्र (परीट) धोबी समाज सेवा मंडळाचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. एकनाथ बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषारभाऊ रंधे होते.
यावेळी राष्ट्रीयउपाध्यक्ष सदाशिव ठाकरे, आशाताई रंधे, सीमाताई रंधे, रोहित रंधे, जिल्हाध्यक्ष सागर सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष सुनील सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष भास्कर बोरसे आदी मान्यवरांनी राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन केले. कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ बंधू-भगिनींचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या स्वच्छतेच्या संदेशाला अनुसरून गाडगेबाबा उद्यान परिसरात ट्रॅक्टरच्या सहाय्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाशिव ठाकरे यांनी केले.
या कार्यक्रमास आशाताई रंधे, रजनी लुंगसे, सीमाताई रंधे, निशांत रंधे, रोहित रंधे, बेडीस्कर दादा, भगवान वाघ, उमेश खैरनार, ज्ञानेश्वर ईशी, नरेश पवार, योगेश धोबी, बापू ठाकरे, गोलू धोबी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन भास्कर बोरसे, सुनील सूर्यवंशी व नरेश पवार यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव व महिला भगिनी उपस्थित होत्या.
0 Comments