Header Ads Widget

*जनता हायस्कूल मध्ये राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त गणितोत्सव उत्साहात साजरा*

 *शिंदखेडा येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे भारतीय महान प्रतिभावंत शास्त्रज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली* 
    *कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील यांच्या शुभहस्ते श्री रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन  करून  गणितीय रांगोळी व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन दालनाचे उद्घाटन  ही करण्यात आले. याप्रसंगी अशोक हार्डवेअर चे संचालक श्री हर्षल अशोक पाटील, प्राचार्य श्री एस.एस पाटील पर्यवेक्षक श्री बी जे पाटील वरिष्ठ लिपिक श्री किशोर गोरख पाटील आदी मान्यवर उपस्थित होते* 
  *कार्यक्रमाचे औचित्य साधून गणित उत्सव उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी चित्रकला,रांगोळी,गणित प्रश्न मंजुषा,वकृत्व स्पर्धा,गणितीय मॉडेल आदी स्पर्धेचे आयोजन करून विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले आले* 
  *याप्रसंगी महानगणित शास्त्रज्ञ श्री श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन व त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय उपशिक्षक श्री  ए.टी पाटील यांनी आपल्या मनोगतातून करून दिला. तसेच गणित दिवस साजरा करण्यामागील उद्देश श्री रामानुजन यांचा महान शास्त्रज्ञ म्हणून परिचय तसेच विद्यार्थ्यांमधील गणितीय दृष्टिकोन,तर्कशक्ती आणि आत्मविश्वास वाढवणे हा होता असे मत गणित शिक्षक व पर्यवेक्षक श्री बी जे पाटील यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले* 
  *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील तर मान्यवरांचे आभार श्री डी एच सोनवणे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री आर पी वाघ ,श्री सी व्ही पाटील श्री एल पी सोनवणे श्रीमती एन जे देसले श्रीमती व्ही एच पाटील श्रीमती पी यू पवार श्रीमती पी ए पाटील श्रीमती जे ए पाटील,शिक्षकेतर कर्मचारी,श्री डी एम धनगर श्री मनोज मराठे श्री अमोल देसले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.*

Post a Comment

0 Comments