Header Ads Widget

*भारतरत्न, थोर राष्ट्रनेते, माजी पंतप्रधान, कुशल राजकारणी, ओजस्वी वक्ते आणि संवेदनशील कवी* *स्व.अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम व भावपूर्ण अभिवादन.**

 

सहिष्णुता, संवाद, राष्ट्रभक्ती आणि लोकशाही मूल्यांवर आधारित राजकारणाचा आदर्श त्यांनी देशासमोर ठेवला. मतभेद असले तरी मनभेद नकोत, हा संस्कार त्यांनी सार्वजनिक जीवनात रुजवला. पोखरण अणुचाचणी, सुवर्ण चतुर्भुज महामार्ग योजना, ग्रामसडक योजना, दूरदर्शी परराष्ट्र धोरण अशा ऐतिहासिक निर्णयांतून त्यांनी भारताच्या सामर्थ्याची ओळख जगाला करून दिली.

राजकारणात शुचिता, विचारांत स्पष्टता आणि कृतीत राष्ट्रहित हेच त्यांचे खरे वैशिष्ट्य होते. आजही त्यांचे विचार, कविता आणि नेतृत्वशैली देशातील प्रत्येक कार्यकर्त्यास प्रेरणा देत आहेत.

“राष्ट्र प्रथम” हा मंत्र घेऊन त्यांनी देशाला स्थैर्य, आत्मविश्वास आणि जागतिक स्तरावर मान सन्मान मिळवून दिला.

त्यांचे विचार, कर्तृत्व आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत सदैव आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहो. *उपस्थित दोंडाईचा संस्थांचे राजकुमार बाबाराजे जयअदितसिंह रावल* दोंडाईचा शहराध्यक्ष भाजपा जितेंद्र गिरासे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण महाजन, नगरसेवक कृष्णा नगराळे, नगरसेवक जितेंद्र गिरासे सर, नगरसेवक चतुर पाटील, नगरसेवक भैय्या धनगर माजी नगरसेवक किशनभाई धोदेचा, नगरसेवक बबलू देवरे, नगरसेवक राकेश अग्रवाल, नगरसेवक संजोग रामोळे, भाजपा उपाध्यक्ष मनोज तेले, संजय अग्रवाल, मच्छिंद्र मराठे, देवा पाटील, राजू बाबा धनगर, व सर्व नगरसेवक व पदअधिकारी उपस्थिती होते *
✍️✍️श्री पांडुरंग शिंंपी प्रतिनिधि दोंडाईचा*.

Post a Comment

0 Comments