Header Ads Widget

कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयात नुकताच राष्ट्रीय गणित दिवस मोठ्या उत्साहात साजरा


सुजाण नागरिक सा.प्रतिनीधी श्री सी जी वारूडे 
      तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयात नुकताच राष्ट्रीय गणित दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
       यावेळी कार्यक्रमास अध्यक्ष विद्यालयाचे प्रेरणास्रोत मुख्याध्यापक आदरणीय आबासाहेब श्री एस ए कदम सर यांच्या हस्ते प्रतिभावंत भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक आदरणीय आबासाहेब यांनी  गणित विषय अध्यापन करणारे शिक्षक - मा.श्री.पी.आर.पाटील सर व एम.एस.पाटील सर यांना श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
     तद्नंतर विद्यार्थ्यांनी गणित विषयी आपापली मनोगत व्यक्त केले व गणित विषय शिक्षक मा.श्री.पी आर पाटील यांनी थोर गणित श्रीनिवास रामानुजन यांच्या चौरस गणितीजादूयोगदानाविषयी व जीवनचरित्राविषयी मनोगत व्यक्त केले.
     तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक आबासाहेब श्री एस ए कदम सर यांनी प्रतिभावंत भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिवस २२/डिसेंबर रोजी संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय गणित दिन' विषयी घोषणा २०१२मध्ये माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग रामानुजन यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त या दिवसाची राष्ट्रीय दिन म्हणून घोषणा करण्यात आली.व दैनंदिन जीवनात व्यवहार गणित करतेवेळी  ➕ ➖ ✖️ ➗🟰 या चिन्हाच्या आधारास्व आपापले जीवन ही कसे घडवायचे म्हणजे जीवनात आधिक व्हावे की वजाबाकी व्हावे हे शालेय जीवनातून विविध विषयांद्वारे शिकता येते उदा. संत ज्ञानेश्वरी व  छत्रपती शिवाजी महाराज इ.दाखले देऊन गणित विषयी चे महत्व अध्यक्षांनी पटवून दिलेत.
      यावेळी कार्यक्रमास मुख्याध्यापकसाहेब, शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू -भगिनी व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस बी भदाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन -श्री.पी.आर.पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments