शिंदखेडा येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे' असा वैश्विक मानवतेचा संदेश देणारे थोर समाजसेवक, लेखक आणि स्वातंत्र्यसेनानी पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी पर्यवेक्षक श्री बी जे पाटील यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री डी एच सोनवणे,श्री एस ए पाटील,श्री पी व्हि.देशमुख,श्री जे डी बोरसे,श्रीमती पी ए पाटील आदी उपस्थित होते.
श्रीमती पी ए पाटील यांनी श्यामची आई या साने गुरुजी लिखित पुस्तकाचे प्रसंग सांगत साने गुरुजींच्या जीवनाचा परिचय यावेळी विद्यार्थ्यां समोर आपल्या प्रस्ताविकातून मांडला.
तसेच श्री एस ए पाटील यांनी साने गुरुजींच्या साध्या आणि निस्वार्थी जीवनप्रवासाचे वर्णन, गुरुजींचे स्वातंत्र्य लढ्यातील सक्रिय सहभाग याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील तर मान्यवरांचे आभार श्री ए टी पाटील यांनी मानले.
0 Comments