*जनमत-*
*नंदुरबार-*
ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार कायदेविषयक शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार तालुका विधायक समिती संचलीत श्री बटेसिंगभैय्या रघुवंशी विधी महाविद्यालय, कायदेविषयक शिक्षण व संशोधन संस्था, नंदुरबार येथील विद्यार्थिनींनी शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक यश संपादन करून संपूर्ण समाजास प्रेरणादायी संदेश दिला आहे.
उन्हाळी २०२५ विद्यापीठ परीक्षांमध्ये एलएलबी परीक्षेत कु. अनुष्का संजय जवंजाळकर हिने व एलएलएम परीक्षेत कु. मयुरी सुहास चौरे हिने
विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या विद्यापीठ पदवीदान समारंभात दोन्ही गुणवंत विद्यार्थिनींना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. हा सन्मान नॅशनल असेसमेंट ऍक्रेडिएशन कौन्सिल, बंगळुरू येथील संचालक प्रा. डॉ. गणेशन कन्नीवरम यांच्या शुभहस्ते, तसेच मा. कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी व तसेच इतर सर्व मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत, विविध प्राधिकरणांच्या सदस्यांसमोर प्रदान करण्यात आला आहे.विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, कु. अनुष्का जवंजाळकर हिने एलएलबी अंतिम वर्षात तब्बल तीन सुवर्णपदके पटकावून महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेत नवा इतिहास रचला आहे. तिचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
या यशाबद्दल भारताचे माजी ॲडिशनल सॉलिसिटर जनरल मा. ॲड. राजेंद्र रघुवंशी, संस्थेचे चेअरमन मा. आ. श्री चंद्रकांत रघुवंशी, व्हॉइस चेअरमन मा. श्री मनोज भैय्या रघुवंशी, सचिव मा. श्री यशवंत नाना पाटील, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापेकतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकप्राप्त विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.या यशातून कष्ट, शिस्त व गुणवत्तेला संधी दिल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल कामगिरी करू शकतात, हा विश्वास दृढ झाला असून समाजातील तरुण पिढीसाठी हे यश नक्कीच दिशादर्शक ठरणार आहे.
0 Comments