शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथील स्वस्त धान्य दुकान येथून शासकीय योजनेअंतर्गत धान्य वितरण केले जाते परंतु सदर दुकानातून मागील काही महिन्यापासून अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्नधान्य तांदूळ गहू ज्वारी दिले जात आहे दिलेल्या धान्यात कीड लागलेले धान्य दगड माती व कचरा मिसळलेला सळलेला व दुर्गंधीयुक्त माल अशा स्वरूपाचा पुरवठा होत असून तो मानवी उपभोगास अयोग्य आहे याबाबत दुकानदाराकडे तोंडी तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही यामुळे गरीब व गरजू कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तरी या प्रकरणाची तहसील विभागाच्या पुरवठा विभागाकडून चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाचे अन्न आहे मिळेल याची व्यवस्था करावी यासाठी पुरवठा अधिकारी नितीन नंदावार यांना शेवाळे येथील माजी सभापती रणजित सिंग गिरासे माजी सरपंच बबलू कोळी पांडू मोरे देविदास मोरे नानाभाऊ कोळी ज्ञानेश्वर अहिरे तुषार माळी सोमनाथ जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी निवेदन दिले या प्रकरणावर चौकशी व उत्कृष्ट दर्जाचे धान्य न दिल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. वेळोवेळी तक्रार देऊनही पुरवठा विभागाच्या वतीने सबसेल दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांनी आरोप यावेळी केले.पुरवठा अधिकारी कडे वारंवार तक्रार करून ही दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थांनी आज तहसील कार्यालयात संताप व्यक्त केला.
0 Comments