सुजाण नागरिक सा.प्रतिनिधी श्री सी जी वारूडे
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकतीच परमपुज्य " साने गुरुजी " जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित, अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या विद्यालयात थोर साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक परमपूज्य "सानेगुरुजी" यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले.व या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे आदरणीय प्रेरणास्रोत मार्गदर्शक मुख्याध्यापक आबासो. श्री.एस.ए.कदम सरजी यांच्या हस्ते परमपूज्य 'सानेगुरूजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थींनींनी " खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे" ही प्रार्थना व बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो,
हे गीत सादर केले नंतर विद्यार्थ्यांनी सानेगुरुजींविषयी भाषणं केली
त्यानंतर विद्यालयातील सानेगुरुजी संस्कार केंद्र समन्वयकशिक्षक-श्री.सी.जी.वारूडे,
श्री.पी.आर.पाटील,श्री.एस.एस.पाटील,
श्री.आर.बी.गवळे,श्री.एम.एस.पाटील आदींनी ही सानेगुरुजींविषयी मनोगत व्यक्त केलेत.
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आबासाहेब श्री एस ए कदम यांनी प्रथमतः परमपूज्य सानेगुरुजी यांच्या बालपणीच्या आठवणी त्यात पंढरी, पंढरीनाथ व शाळेतील नाव पांडुरंग सदाशिव साने होय त्यांचे मुळगाव देवरूख परंतु त्यांचे बालपण व शालेय जीवन पालगड ता.दापोली जि.रत्नागिरी व त्यांची कर्मभूमी अमळनेर, सानेगुरुजीनीं लिहिलेल्या साहित्यातील मातृत्वभक्तीने भावदर्शक भरलेले "श्यामची आई" या पुस्तकातील एक विलक्षण अनुभव व "धोंड्यावर(दगडावर)आंघोळ",आंघोळ झाल्यावर पंढरी म्हणायचे आई मी घरात कसा येऊ माझे पायाचे तळवे ओले आहे,आईनं पदर पसरून श्यामला म्हणाल्या "जसं पायांच्या तळव्यांना घाण लागू नये म्हणून म्हणतोस ना!श्याम, तसं जीवनात तुझ्या मनाला घाण लागणार नाही म्हणून वाग श्याम! इत्यादी व सानेगुरुजींनी माणूसकी धर्म, विश्वप्रेमाचा संदेश "खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे" सानेगुरुजी एक शिक्षकच नव्हे तर एक स्वांतत्र्य सेनानी, थोर साहित्यिक,कळकळीचे राष्ट्रभक्त,समाज सुधारक,एक महान विश्व मानव होते इ.विषयीचे मनोभाव व्यक्त करत 'हरण व सिंह' या गोष्टीतून "आत्मपरीक्षण " या शब्दातील महत्त्व स्वानुभव पटवून दिलेत
यावेळी कार्यक्रमास विद्यार्थीवर्ग,
मा.मुख्याध्यापकसाहेब ,शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.व यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन -
श्री.सी.जी.वारूडे यांनी केले तर
आभार प्रदर्शन-श्री.आर.बी.गवळे यांनी मानले.
0 Comments