शिंदखेडा (यादवराव सावंत.)-डिजिटल न्याय ग्राहकांसाठी जलद, स्वस्त आणि सुलभ न्यायाचा नवा मार्ग आहे असे मत ग्राहक
पंचायत महाराष्ट्र धुळे जिल्हा संघटक व ग्राहक संरक्षण
परिषदेचेअशासकीयसदस्य प्रा.चंद्रकांत
डागा यांनी व्यक्त केले. ते शिंदखेडा तहसील प्रशासन व ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा शिंदखेडा तर्फे आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालयात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक
विजयसिंह राऊळ होते. स्वामी विवेकानंद साने गुरुजी व ग्राहक तीर्थ बिंदूमाधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविक ग्राहक पंचायत महाराष्ट्र शिंदखेडा तालुका अध्यक्ष माजी प्राचार्य प्रदीप दीक्षित यांनी केले.
24 डिसेंबर रोजी साजरा होणारा राष्ट्रीय ग्राहक दिन हा ग्राहकांच्या हक्कांची आठवण करून देणारा महत्त्वाचा दिवस आहे. 2025 च्या राष्ट्रीय ग्राहक दिनाची थीम
“Efficient and Speedy Disposal through Digital Justice”
म्हणजेच डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम व जलद तक्रार निवारण ही आजच्या बदलत्या तंत्रज्ञानप्रधान युगातील अत्यंत व्यवहारिक आणि गरजेची संकल्पना आहे. ही होती
प्रा.डागा पुढे म्हणाले,आजचा ग्राहक अधिक जागरूक झाला आहे, मात्र तक्रार निवारणाची प्रक्रिया क्लिष्ट आणि वेळखाऊ असल्यामुळे अनेकजण अन्याय सहन करतात. डिजिटल न्याय हीच ही अडचण दूर करण्यासाठी पुढे आलेली प्रभावी व्यवस्था आहे.
पूर्वीची आणि आताची परिस्थिती.
पूर्वी ग्राहक आयोगात तक्रार करणे म्हणजे प्रत्यक्ष कार्यालयात फेऱ्या,
कागदपत्रांची जुळवाजुळव,
वारंवार तारखा,प्रवासाचा खर्च आणि वेळेचा अपव्यय यामुळे अनेक ग्राहक “सोडून द्या” असे म्हणून माघार घेत.
आज मात्र डिजिटल न्यायामुळे ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुलभ झाली आहे.डिजिटल न्याय म्हणजे ग्राहकाने मोबाईल किंवा संगणकावरून,
तक्रार ऑनलाईन दाखल करणे
बिल, करार, फोटो, व्हिडिओ पुरावे अपलोड करणे प्रकरणाची स्थिती घरबसल्या तपासणे,
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीस हजर राहणे हे सर्व शक्य झाले आहे.
याचे अनेक व्यवहारिक उदाहरणे त्यांनी दिलीत. सर्व घटकांनाही समान संधी मिळते.पारदर्शकता आणि जबाबदारी वाढतेप्रलंबित प्रकरणांचा ताण कमी होतो.महत्त्वाचे म्हणजे, ग्राहकाला “न्याय मागण्याची भीती” उरत नाही.
डिजिटल न्याय ही केवळ सुविधा नसून राज्यघटनेने दिलेल्या न्यायाच्या हक्काची अंमलबजावणी आहे.
सरकार, ग्राहक आयोग, आणि प्रशासकीय यंत्रणांनी डिजिटल साक्षरता वाढवणे, प्रणाली अधिक सुलभ करणे आणि ग्रामीण भागात जनजागृती करणे अत्यावश्यक आहे.भविष्यातील ग्राहक न्यायव्यवस्थेची दिशा दर्शवते.
डिजिटल न्यायामुळे ग्राहक, व्यापारी आणि न्यायसंस्था , तिन्ही घटकांना फायदा होतो.न्याय दारात येतो, हीच डिजिटल न्यायाची खरी ताकद आहे.
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने प्रत्येक ग्राहकाने आपले हक्क ओळखून, डिजिटल माध्यमांचा योग्य वापर करून अन्यायाविरोधात आवाज उठवणे, हीच काळाची गरज आहे.
***या प्रसंगी या शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन केले गेले ग्राहकांचे अधिकार हक्क व कर्तव्य सायबर गुन्हे व बँकिंग जागृती ग्राहक संरक्षण कायदा 2019 ही विषय दिले गेले होते या स्पर्धेत एकूण 66 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रथम क्रमांक धनश्री सुभाष वाडीले एम एच एस एस हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, द्वितीय क्रमांक धनुष्का विनोद पवार कै. आण्णासाहेब एन. डी.मराठे विद्यालय व महाविद्यालय, तृतीय क्रमांक नेहा खंडेराव मोरे जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय ,चतुर्थ क्रमांक पूजा लक्ष्मण महाजन एस एस व्ही पी महाविद्यालय, पाचवा क्रमांक जयश्री रवींद्र माळी श्री स्वामी समर्थ ज्युनिअर कॉलेज या विद्यार्थ्यांनी पटकविला. त्यांना तहसील प्रशासनातर्फे अनुक्रमे रुपये 500, 400 300, 200 व 100 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन व परिश्रम तालुक्याचे तहसीलदार नितीन देवरे यांच्या मार्गदर्शनानुसार तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन नंदावर यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी घडवून आणला राष्ट्रीय ग्राहक दिन तालुक्याच्या ठिकाणी अतिशय प्रसन्न व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला
कार्यक्रमाला ग्राहक पंचायत महाराष्ट्र सदस्य व संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य जितेंद्र मेखे,माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश चौधरी, गुलाबराव पाटील, भाईदास पाटील, आर आर पाटील, सुनिता भामरे , सविता परदेशी,तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी नितीन नंदावार, पुरवठा लिपिक चैताली शिंदे, के एस मराठे, सुनील पारधी,विलास पारधी, धनराज पाटील, एस एस बिराडे सह मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments