Header Ads Widget

शिंदखेडा एमएचएसएसमध्ये ग्राहक दिनानिमित्त यशस्वी वकृत्व स्पर्धा

शिंदखेडा (वा.)- राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त एम एच एस एस हायस्कूल व क. महाविद्यालयात वकृत्व स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले.                            एम.एच एस एस हाय. व क महाविद्यालय शिंदखेड़ा येथे दि.24/12/25 रोजी ग्राहक दिना निमित्ताने  वकृत्व स्पर्धा घेण्यात आली.ग्राहकाचे हक्क, अधिकार व कर्तव्य व सायबर गुन्हे व बँकिंग जागृती हे स्पर्धेचे विषय देण्यात आले होते. ग्रामपंचायत महाराष्ट्र धुळे जिल्हा संघटक 
चंद्रकांत डागा यांच्याकडुन रोख बक्षीस देण्यात आली.तसेच साने गुरूजी जयंती साजरी झाली.                                                     सर्व प्रथम स्वामी विवेकानंद, सानेगुरूजी, बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते केले.  प्रमुख वक्ते प्रा. डागा यांनी ग्राहकाला कसे नाडले जाते याचे अनेक उदाहरणे देऊन,त्यांना असणारे अधिकार परखडपणे मांडले. प्रा.परेश शाह यांनी सा नेगुरूजीचे जीवन कार्यविषयी माहिती दिली. अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री टी एन पाटील  हे होते त्यांनी वकृत्व स्पर्धेचा हेतू,साने गुरुजीचे विचार रुजले पाहिजे, चिकित्सक ग्राहक बनावे असे सांगितले. वकृत्व स्पर्धेसाठी 5 स्पर्धक होते. त्यापैकी प्रथम बक्षीस-प्रतिक्षा पाटील ,   द्वितीय -अक्सा तेली तृतीय बक्षीस -पुनम सुर्यवंशी  यांनी मिळवले. त्यांना अनुक्रमे रोख 125, 100व 75रुपयांचे पारितोषिक दिले गेले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.भीमराव कढ़रे  यांनी केले. परिक्षक म्हणून प्रा. माधुरी शिंदे, प्रा.दिप्ति भोसले  होते. आभार प्रा.जे.के.परमार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments