नरडाणा--शिंदखेडा तालुक्यात सुशासन सप्ताहात फेरफार अदालतीने शेतकऱ्यांना दिला दिलासा
म. जिल्हाधिकारी सो भाग्यश्री विसपुते मॅडम यांच्या आदेशानुसार सुशासन सप्ताह राबविण्याबाबत ज्या सूचना प्राप्त झाल्या त्यानुसार म उपविभागीय अधिकारी शरद मंडलीक साहेब व शिंदखेडा तालुक्यातील तहसीलदार सो नितीनकुमार देवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे नरडाणा मंडळात दि. 23/12/2025 रोजी सुशासन सप्ताहांतर्गत दि. 23 डिसेंबर 2025 रोजी फेरफार अदालत घेण्यात आली. या अदालतीत अनेक शेतकरी बांधवांना जुन्या नोंदीबाबत तसेच काळबाह्य नोंदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. परिणामी अनेक नोंदी निकाली काढण्यात आल्या. तसेच शासनाच्या अनेक योजनाबाबत माहिती देण्यात आली तसेच भोगवटदार वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 करण्याबाबत लोकांना प्रोत्साहित करण्यात आले.तसेच अनेक लाभार्थींना जिवंत 7/12 अंतर्गत 7/12 उतारे वितरित करण्यात आले. यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे. विशेषत: रब्बी पिकपाहणी बाबतही मार्गदर्शन देण्यात आले.या उपक्रमामुळे प्रशासन गावाकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी अशा फेरफार अदालतींचे महत्व अधोरेखित झाले आहे. यासाठी नरडाणा मंडळ स्तरावर मंडळ अधिकारी स्वाती वाघ यांनी मार्गदर्शन केले असून त्यासाठी प्रफुल मोरे ग्राम महसूल अधिकारी नरडाणा, महेंद्र पाटील ग्राम महसूल अधिकारी जातोडा, मोनाली पवार ग्राम महसूल अधिकारी माळीच, योगेश भिल ग्राम महसूल अधिकारी पाष्टे, गोविंदा माळी ग्राम महसूल अधिकारी वारुड,अमृत शिंदे कोतवाल जितेंद्र सोनवणे वारुड ग्रामस्थ, शेतकरी बांधव आदी उपस्थित होते.
0 Comments