___________________________________________
शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव जवळ असलेल्या सोनवद धरणात यावर्षी शंभर टक्के पाणीसाठा गोळा झालेला आहे या धरणावर सुमारे परिसरातील 2147 हेक्टर जमिनीचे सिंचन होऊ शकते परिसरात डोंगरगाव कांचनपूर ,वालखेडा ,वाघडी, वांघाडी खु कलमाडी ,वाघाडी बु ,मांळीच इत्यादी गावांच्या शेतीचा समावेश असून या परिसरात रब्बी पेरणी पूर्ण झालेली आहे म्हणून पाण्याची आवश्यकता असल्याने डी डी सी सी बँकेचे मा ,संचालक प्रकाश पाटील पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे मा, सरपंच नरेंद्र पाटील चीमठाणा यांनी धुळे येथील सिंचन विभागातील कार्यकारी अभियंता यांना पाणी सोडण्यासंदर्भात निवेदन दिले लवकरच शेतीस पाणी मिळणार असे समजले
0 Comments