Header Ads Widget

ऐतिहासिक पंचकल्याणक महामहोत्सव बेटावद नगरीत धार्मिक उत्साहात संपन्न.


आसिफ पठाण बेटावद प्रतिनिधी 
 शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावात  दिगंबर जैन समाजाचा अतिशय पवित्र आणि भव्य असा श्री १००८ संभवनाथ भगवान पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव दिनांक १० ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत अलोट उत्साहात पार पडले या सहा दिवसीय महामहोत्सवादरम्यान संपूर्ण बेटावद नगरी धार्मिक आणि अध्यात्मिक वातावरणाने भारून गेली होती
भव्य सजावट आणि उत्साहाचे वातावरण ठरले आकर्षण
बेटावद येथील ऐतिहासिक धर्मनगरीचे पूर्ण पाषाण निर्मित श्री १००८ संभवनाथ दिगंबर जैन मंदिराच्या परिसरात या महामहोत्सवासाठी अत्यंत आकर्षक आणि नेत्रदीपक सजावट करण्यात आली होती केवळ मंदिराच्या आवारातच नव्हे, तर जेथे मुख्य कार्यक्रम सुरू होते, त्या मंडपातही उत्कृष्ट कलात्मक सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे कार्यक्रमाला आलेले सर्व भाविक भारावून गेले

या महामहोत्सवाला आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज आणि नवाचार्य श्री १०८ समयसागरजी महाराज आणि श्रमण १०८ मुनीश्री नियमसागर जी महाराज यांचे मंगलमय आशीर्वाद लाभले तसेच, मुनीश्री वृषभसागरजी महाराज आणि मुनीश्री अभिनंदनसागरजी महाराज यांचा पावन सानिध्यात हा सोहळा संपन्न होत आहे 

दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी गर्भ कल्याणक पासून सुरू झालेला हा महोत्सव 
११ डिसेंबरला घट यात्रा, गर्भ कल्याणक विधी संपन्न झाला
१२ डिसेंबरला जन्म कल्याणक, मौजी बंधन विधी उत्साहात पार पडले
दिनांक १३ डिसेंबरला तप कल्याणक  विधी सुरू ठेवत, सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले
दिनांक १४ डिसेंबरला ज्ञान कल्याणक अत्यंत महत्त्वाचा विधी संपन्न झाला यात नवदीक्षित, महामुनीराज आहारचर्या (पंचाश्वर्य) विधी आणि समवशरण रचना करून केवल ज्ञान कल्याणक पूजन करण्यात आले

शेवटच्या दिवशी १५ डिसेंबर २०२५ रोजी, या पंचकल्याणक महामहोत्सवाचा समारोप मोक्ष कल्याणक आणि प्रभुंचे मोक्षगमन (निर्वाण प्राप्ती) विश्वशांती महायज्ञ, पूर्णाहुती हवण, ही क्रिया संपन्न झाली यानंतर श्रीजींच्या स्थापन, कलशारोहण आणि ध्वजारोहण, पूजन करण्यात आले  ज्यामुळे बेटावद येथील श्री १००८ संभवनाथ दिगंबर जैन मंदिर पूर्णत्वास आले

या पवित्र प्रसंगी श्री १००८ संभवनाथ दिगंबर जैन ट्रस्ट, बेटावद व सकल दिगंबर जैन समाज, बेटावद यांच्या वतीने दररोज सकाळी व संध्याकाळी धार्मिक कार्यक्रम, प्रवचने, भक्तीगीतांचे आयोजन केले होते

या भव्य सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन धर्मलाभ घेतला.

Post a Comment

0 Comments