मुंबई : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या पत्रमहर्षी रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.. परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाला 2025चा आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.. बेला, चामोर्शी, नांदगाव-मनमाड, पनवेल, आंबेगाव, किनवट, संग्रामपूर, अंबाजोगाई आणि मुंबई उपनगर या तालुका संघांना आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची घोषणा मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी केली आहे.. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांना दरवर्षी पुरस्कारांनी गौरविले जाते.. आठ महसूल विभागातून प्रत्येकी एका तालुका संघाची निवड केली जाते.. यावेळी विशेष बाब म्हणून विदर्भातून दोन तालुका संघांना तसेच मुंबई उपनगरांतून एका पत्रकार संघाला सन्मानित केले जाणार आहे.. राज्यातील 36 जिल्ह्यातून एका आदर्श जिल्हा संघाची निवड केली जाते.. 2025 मधील आदर्श जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार परभणी जिल्हा पत्रकार संघाला देण्यात येत आहे..
पुढील तालुका संघांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत..
नागपूर विभाग : बेला तालुका पत्रकार संघ जिल्हा नागपूर, नागपूर विभाग : चामोर्शी तालुका पत्रकार संघ, जि. गडचिरोली, नाशिक विभाग : नांदगाव - मनमाड मराठी पत्रकार संघ जिल्हा नाशिक, कोंकण विभाग : पनवेल महानगर प्रेस क्लब जि. रायगड, पुणे विभाग : आंबेगाव तालुका पत्रकार संघ जि. पुणे, लातूर विभाग : किनवट तालुका पत्रकार संघ जि. नांदेड, संभाजीनगर विभाग : अंबाजोगाई तालुका पत्रकार संघ जि. बीड, अमरावती विभाग : संग्रामपूर तालुका पत्रकार संघ जि. बुलढाणा, कोल्हापूर विभाग : पलूस तालुका मराठी पत्रकार संघ जि. सांगली., मुंबई विभाग :उपनगर पत्रकार असोशिएशन, सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप असून दरवर्षी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येते.. पुरस्कार वितरणाचा हा सोहळा अत्यंत दणदणीत होतो.. राज्यभरातून किमान हजार पत्रकार या सोहळ्यासाठी उपस्थित असतात.. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल अशी माहिती अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.. पुरस्कार प्राप्त सर्व तालुका पत्रकार संघाचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर,विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे,कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, राज्य प्रसिध्दीप्रमूख संदीप कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे......
****
0 Comments