पाष्टे, दि. २६ डिसेंबर : विकसित भारत-रोजगार व अजीविका हमी मिशन (ग्रामीण) VB-G-RAM G अधिनियम २०२५ मधील तरतुदींवर चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायत पाष्टे येथे मा. सरपंच श्री. मोतीलाल नामदेव वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी ठीक ९.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा घेण्यात आली.
सदर सभेत अधिसूचनेतील तरतुदींची सविस्तर माहिती ग्रामपंचायत अधिकारी श्री. डी. एन. पवार यांनी दिली. ग्रामस्थांना रोजगार व अजीविका हमी योजनेच्या लाभांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच महिलांमधून मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
ग्रामस्थांनी विविध सूचना नोंदवल्या असून, या अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत सक्रिय भूमिका बजावेल,
0 Comments