शब्द,खरंच अडीचक्षरी मात्र बळ कल्पनेपलीकडे! माणूस जन्माला येताच काहीतरी करून तो घरचांचं लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी वापरतो तेच शब्द.. मग अअअअ असो ममम असो वा आई असो! पुढे वाढत्या वयाबरोबर आपण आपल्या डोक्यात, जी गोष्ठ भविष्यात कामाला येईल ती साठवतो ती म्हणजेच शब्द भांडार!!! या शब्द भांडारचा खजिना ज्याला मिळाला तोच जगात होतो मग अजिंक्य,यशस्वी!! एकवेळ पैशानी आपण दरिद्री असलो तरी आपले जीवन धकू शकते. मात्र शब्द दरिद्री असणे म्हणजे प्रचंड हेटाळणीचे जगणे ठरते. तेव्हा वाचन मशागतीने शब्दाचे पीक घ्या, जीवन शब्द समृद्ध करा. जीवनभर शैतानी इंग्रजी सत्तेशी लढणाऱ्या गांधींनी गोळी लागल्यावर मरताना तोंडातून 'हे राम 'या शब्दाचाच घेतला होता आधार!!!एक लक्षात ठेवा मोठमोठी युद्धात प्रचंड मिसाईल, बॉम्ब वापरले जातात मात्र जेव्हा युद्ध संपून युद्ध करार होतात तेव्हा सहारक शस्त्रावर मात करतात ती हीच "शब्द "असे आहे हे 'शब्द महात्म्य"!!! प्रभाकर सूर्यवंशी,संपादक अ खा. धुळे
0 Comments