शिंदखेडा येथील पंचायत समिती शिक्षण विभाग व तालुका मुख्याध्यापक संघ ,तालुका विज्ञान गणित अध्यापक संघ शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमानाने पंचायत समिती कार्यालय शिंदखेडा येथे तालुकास्तरीय सहविचार सभा संपन्न झाली.
पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी श्री.डी.एस.सोनवणे सभेच्या अध्यक्षस्थानी होते तर सदर सभेस शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष श्री एस.ए.कदम,सचिव श्री.एम.डी.पाटील,तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष श्री सुधाकर माळी ,सचिव श्री.ए.टी.पाटील,सल्लागार श्री जे.डी.भदाणे संयोजक श्री एन.एस.सोनवणे श्री महेंद्र महाजन आदी मान्यवर उपस्थित होते
सभेत या शैक्षणिक वर्षात संपन्न होणाऱ्या शिंदखेडा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन या मुख्य विषयावर चर्चा करण्यात आली तसेच वर्षभरात घेण्यात आलेल्या विज्ञान व गणित उपक्रमांची माहिती मांडण्यात आली.शैक्षणिक वर्ष 2025 -26 या वर्षाचे विज्ञान प्रदर्शनाचे मुख्य विषय विकसीत व आत्मनिर्भर भारतासाठी STEM हा असून यात उपविषय शाश्वत शेती,कचरा व्यवस्थापन व प्लास्टिक ला पर्याय,हरित ऊर्जा,उदयोन्मुख तंत्रज्ञान,मनोरंजक गणित मॉडेलिंग,आरोग्य व स्वच्छता हे असणार आहेत सदर प्रदर्शन दिनांक 23 व 24 डिसेंबर रोजी एन डी मराठे हायस्कूल शिंदखेडा येथे संपन्न होणार आहे.तरी शिंदखेडा तालुक्यातील जास्तीत जास्त माध्यमिक शाळांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी श्री.डी एस सोनवणे यांनी केले आहे.
0 Comments