Header Ads Widget

शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप


बेटावद : शिंदखेडा तालुक्यातील येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. शांताराम पाटील व बेटावद येथील सामाजिक कार्यकर्ते देवाजी माळी तसेच अशोक वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करून आरोग्यसेवेबाबतचे माहिती देण्यात आली व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक उपक्रम राबवून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमाचे रुग्ण व नागरिकांनी
केंद्राचे स्वागत केले. या कार्यक्रमास प्राथमिक आरोग्य वैद्यकीय डॉक्टर तसेच मेडिकल ऑफिसर डॉ. प्रज्ञा पाटील, वैभव बेडसे, शिंपी सिस्टर, अनुसया
चांदेकर तसेच बेटावद येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लोटन माळी, पावभा कोळी, वसंत आबा, सुजित पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments