Header Ads Widget

*खान्देश पत्रकार संघाचा ‘खान्देश गौरव’ ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र पाटील यांना प्रदान*


धुळे:-खान्देश पत्रकार संघ,धुळे यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “खान्देश गौरव पुरस्कार” यंदा ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र पाटील यांना प्रदान करण्यात आला. मुंबई येथे कार्यरत असलेले आयएएस अधिकारी भाई नगराळे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पत्रकारितेतील दीर्घकाळाचा निष्ठावंत प्रवास, समाजहिताचे प्रश्न सातत्याने मांडणे तसेच खान्देशातील ग्रामीण व वंचित घटकांचा आवाज ठामपणे मांडण्याचे कार्य भालचंद्र पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत खान्देश पत्रकार संघातर्फे त्यांची निवड करण्यात आली.
पुरस्कार स्वीकारताना भालचंद्र पाटील यांनी, पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असल्याचे मत व्यक्त केले. तसेच सत्य, निर्भीडता आणि सामाजिक बांधिलकी जपत पुढील वाटचाल सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
या पुरस्कारामुळे भालचंद्र पाटील यांच्या कार्याचा सन्मान तर झालाच, मात्र खान्देशातील पत्रकारितेच्या मूल्यांनाही नवे बळ मिळाले असल्याची भावना उपस्थितांतून व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments