धुळे-- सध्याच्या आव्हानात्मक स्थितीत सकारात्मक पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना जीवन गौरव आणी खान्देशभूषण पुरस्कार देण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे उदगार आदिवासी कल्याण विभागाचे निवृत्त सचिव सन्मा. भा.ई.नगराळे यांनी गरुड वाचनालय सभागृहात पत्रकारांना पुरस्कार प्रदान करताना काढलं
शनिवार दिनांक 24 रोजी झालेल्या या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थान निवृत्त न्यायमूर्ती बापूसाहेब जे टी देसले होते. यावेळी सुरुवातीला प्राचार्या रत्नाताई पाटील यांनी मान्यवरांना विचार मंचवर आमंत्रित करून त्यांचा शुभ हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, पूज्य साने गुरुजी प्रतिमा पूजन नंतर मान्यवरांसह केले. त्यांनीच मग संविधान उद्धे्षिकेचे सार्वजनिक वाचन केले.या आधी प्रथम
जीवन गौरव पुरस्कारार्थी जेष्ठ पत्रकार, तोप चे संपादक भाईसाहेब अरुण पाटील यांना हॉल मध्ये तब्येतीमुळे येता न आल्यामुळे सर्व संकेत बाजूला सारून सर्व मान्यवरांनी खाली जाऊन त्यांना राज्यस्तरीय जीवन गौरव.. सन्मान चिन्ह, शाल पुस्तक गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले!
त्यानंतर द्वितीय जीवन गौरव मालेगावच्या से. नि. प्राचार्य तथा विश्व्कर्मा प्रसाद मासिकाचे संस्थापक श्री गंगाधर दिगंबर सोनवणे यांना मानाची शाल प्रेमाचे सन्मान चिन्ह, पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन परिवारासह त्यांचा मान्यवरांनी सन्मान केला
त्या नंतर शहादा तालुका पत्रकार संघ अध्यक्ष प्रा. नेत्रदिपक कुवर, भालचंद्र पाटील, योगेश हिरे रवींद्र खैरनार, विनोद पाटील, प्रा. रवींद्र पाटील, प्रा. दिपक देशमुख, नथु गुजर आणि धनराज पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते खान्देश भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात न्यायमूर्ती बापूसाहेब देसले यांनी पत्रकारांना सकारात्मक पत्रकारितेची समाजाला गरज आहे. पुरस्कार हे असेच कार्य करीत राहण्यासाठी दिलेली कौतुकाची पाठीवर दिलेली शाबासकी असते.असे सांगितले. त्यानंतर झेप मीडिया चॅनल चे प्रा. अनिल चव्हाणांनी खान्देश पत्रिका नेहमी अभिनव उपक्रम राबवितात असे कौतुकास्पद उदगार काढले.त्यानंतर मालेगावचे गंगाधर सोनवणे, प्रा. नेत्रदिपक कुवर, प्राचार्य रवींद्र पाटील, शहाद्याचं जेसवाल, या पुरस्कारर्थिनी आपले मनोगत अध्यक्षीय भाषण नंतर केले त्यानंतर आभार मानताना संघांचे जेष्ठ संचालक प्राचार्य बी बी महाजन यांनी भा. I. नगराळे, बापु साहेब जे टी देसले, अनिल चव्हाण, बापु ठाकूर रमेश अप्पा बोरसे, संघांचे साक्री तालुका अध्यक्ष विलास देसले यांचेही आभार मानले.
कार्यक्रमचं सूत्र संचालन उत्कृषपणे केल्या बद्धल प्राचार्या रत्नाताई पाटील यांचे आणि संघांचे अध्यक्ष प्रभाकर सूर्यवंशी, महासचिव प्रेम कुमार अहिरे यांचा प्रमुख पाहुणे भा. ई. नगराळे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येऊन कार्यक्रम समारोप करण्यात आला.
0 Comments