Header Ads Widget

कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयातील शैक्षणिक सहल नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न

सुजाण नागरिक प्रतिनिधी -श्री.सी.जी.वारूडे
        शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयातील शैक्षणिक सहल नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
          सविस्तर वृत्त असे की, माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित, अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी या.शिंदखेडा जि.धुळे या विद्यालयातील
 *शैक्षणिक सहलीचे आयोजन-नियोजन विद्यालयाचे* आदरणीय प्रेरणास्रोत मार्गदर्शक मुख्याध्यापक आबासो.श्री एस ए कदम सर 
व प्रेरणास्थान आदरणीय आबासाहेब श्री.जे.बी.पाटील, सहल प्रमुख बाळासाहेब श्री.पी.आर पाटील व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू -भगिनी यांच्या मार्गदर्शनात्मक शैक्षणिक सहल - कलमाडी - ओझर, लेण्याद्री, भिमाशंकर, प्रतापगड, महाबळेश्वर, रायगड,मुरुड, जंजिरा,काशीदबीज,पाली,महड, कर्जत,वाई,शहापूर, इत्यादी ठिकाणी शैक्षणिक सहल वरील प्रमाणे गेली असता (प्रवास पहाटे पाच वाजता ७/०१/२०२६ ते ११/०१/२०२६ तरी सदर सहलीत ४०विद्यार्थी (मुले-मुली),तीन शिक्षक,एक शिक्षिका असे एकूण ४४ जण होते, धार्मिक स्थळ देवदर्शन,गड  व पौराणिक किल्ले,धरण-धबधबा वगैरे भौगोलिक दृष्टिकोनातून व माहिती गाईडच्या सहाय्याने व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मुलांना दिली. व 
या शैक्षणिक सहल प्रसंगी बस  शिंदखेडा डेपो ची होती बस चालक मा.एन.एम.खैरनार(चिमठाणे)यांचे ही प्रवासासंदर्भात मोलाचे योगदान लाभले यावेळी 
*सहलीसाठी- सहल प्रमुख*
श्री.पी.आर.पाटील,श्री.एस.एस.पाटील,
श्री.सी.जी.वारुडे, श्रीमती बी.जे कदम
 (भारती मॅडम)या सर्वांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments