महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिंदखेडा तालुक्याचे भाग्यविधाते नामदार जयकुमार भाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदखेड्यात सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्त जनता वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षीत व पौष्टिक भोजनाचे आयोजन तर जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच गायत्री माता प्री-प्रायमरी स्कूल येथील सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले.
सदर उपक्रम संस्था अध्यक्ष व विद्यमान नगरसेवक भाऊसाहेब मनोहर गोरख पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवत सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम विशेष ठरला.
या कार्यक्रम प्रसंगी उद्योजक हर्षल अशोक पाटील, प्राचार्य एस. एस. पाटील, पर्यवेक्षक बी. जे. पाटील, ज्येष्ठ शिक्षक एस. के. जाधव, डी. एच. सोनवणे, एस. ए. पाटील, जे. डी. बोरसे तसेच वरिष्ठ लिपिक किशोर पाटील यांची उपस्थिती होती.
उपशिक्षक एस. ए. पाटील यांनी विद्यार्थ्यांना पालकमंत्री जयकुमारभाऊ रावल यांच्या शिक्षण, जलसंधारण व विकासकामातील महत्त्वपूर्ण योगदानाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही त्यांनीच केले, तर मान्यवरांचे आभार ए. टी. पाटील यांनी मानले.
वाढदिवसानिमित्त दाखवलेला समाजहिताचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून स्थानिक स्तरावर कौतुकास्पद ठरला आहे.
0 Comments