Header Ads Widget

*शीख धर्माचे नववे धर्मगुरू तेग बहादुर यांच्या जयंती निम्मित जनता हायस्कूल मध्ये निबंध स्पर्धा संपन्न.*


  भारतीय संस्कृतीतील शीख धर्माचे नववे धर्मगुरू गुरु तेग बहादुर यांना जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथे त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करत निबंध स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी तेग बहादुर यांच्या प्रतिमेला प्राचार्य श्री एस एस पाटील यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी पर्यवेक्षक श्री बी जे पाटील श्री एस ए पाटील श्री एस के जाधव श्री डी एच सोनवणे वरिष्ठ लिपिक श्री किशोर पाटील आदी उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या औचित्य साधून शिंदखेडा पंचायत समिती शिक्षण विभाग व जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमानाने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात निबंध स्पर्धेत इयत्ता आठवी ते बारावीच्या 120 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 
    या प्रसंगी उपशिक्षक श्री ए टी पाटील यांनी शीख धर्मगुरू श्री तेग बहादुर यांच्या जीवनावर आधारित त्यांचा जन्म व बालपण, गुरुपद आणि गुरुकार्य ,कश्मीर पंडितांसाठी केलेला उठाव तसेच औरंगजेबाला दिलेले आव्हान व त्यांना त्यांच्या शौर्यासाठी मिळालेली हिंद दि चादर या उपाधी याबाबतीत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. 
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील तर मान्यवरांचे आभार श्री जे डी बोरसे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments