प्रतिनिधी l शिंदखेडा : धुळे ग्रंथोत्सव २०२५ अंतर्गत शिरपूर एज्युकेशन सोसायटी आणि जिल्हा ग्रंथालय कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ व १८ जानेवारी रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात
आले.त्यावेळी १७ जाने. रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्व.रावसाहेब प्रभाकरराव चव्हाण प्रतिष्ठान महिला मंडळ माळी गल्ली शिरपूर यांनी नानासाहेब सुभाष अहिरे लिखीत व प्रवीण माळी दिग्दर्शित आहेर या नाटकाचे सादरीकरण केले. या सादरीकरणाने नवीन तरुणाईला आपल्या खानदेशी लग्न संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडवून दिले. विशेष म्हणजे या नाटकातील एकही महिला पूर्वी स्टेजवर कधी गेलेले नाही. मात्र त्यांनी केलेले सादरीकरण प्रेक्षकांच्या डोळ्यातील अश्रू काढणे इतपत उंचीवर गेले. त्यानंतर दि १८ जानेवारी रोजी कथाकथन सदर मध्ये महाराष्ट्रात नावाजलेले व प्रसिद्ध असे प्रवीण माळी यांचं आयत पोयत सख्यानं या एकपात्री प्रयोगाचे अत्यंत विलोभनीय सादरीकरण केले.आपल्या खानदेशी लग्न संस्कृती व त्यातील विकृतींवर प्रकाश झोत टाकून उपस्थित मान्यवरांना मनमुरादपणे हसवले. आजचा युवक, बाप मुलगीचे नाते,अहिराणी ओव्या,खाद्य संस्कृती,दैव संस्कृती याविषयी अत्यंत मार्मिकपणे सादरीकरण केले. तुफान हास्याचा फवारा उडवत युवक युवती आणि उपस्थित प्रेक्षकांना वैचारिक मेजवानी देऊन कार्यक्रमाने उंची वाढवली.या प्रयोगाने उपस्थितांची मने जिंकली. आ.अमरीशभाई पटेल तथा भूपेश भाई पटेल,नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपनगराध्यक्ष संगीताताई देवरे,सचिव रेषा पटेल,राजगोपाल भंडारी, छगन गुजर,कमलकिशोर भंडारी, प्रा. वैशाली पाटील, प्राचार्य महाजन सर, नगरसेवक बाबुलाल भिका माळी यांनी कौतुक केले.तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील यांनी अभिनंदन केले. संस्थेचे सर्व प्राध्यापक,साहित्यिक व सर्व प्रेक्षकांना दीड ते दोन तास खिळवून ठेवून प्रवीण माळी यांनी आपल्या झकास अभिनयातून खानदेशातील अहिराणी भाषेचे व संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडवत धुळे ग्रंथोत्सवाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
0 Comments