शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामिण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कै. भाऊसाहेब एम. डी. सिसोदे कला, वाणिज्य व डॉ. उषाताई प्रसादराव तनपुरे विज्ञान महाविद्यालय नरडाणा यांच्या सयुक्त विद्यमाने दत्तक गाव विटाई, ता. शिदखेडा येथे दि.15 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत "शाश्वत विकासासाठी युवक" या मध्यवर्ती सकल्पनेवर आधारीत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उदघाटन गावातील माजी सैनिक परिवारातील सदस्य माजी नायब तहशिलदार श्री. सुरेश उत्तमराव खैरनार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ग्रा. वि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष संजयकुमार सिसोदे यानी भूषविले. कार्यक्रमास सरपंच श्री.लिलाधर खैरनार, उपसरपंच श्रीमती मनिषा संदिप पाटील, श्रीमती रंजनाबाई राजेंद्र शिरसाठ (ग्रा.प.सदस्य), श्री. माधव अहिरे (ग्रा.प.सदस्य), श्री. चिंतामण खैरनार (मा. सरपंच), श्री. संदिप पाटील (मा. ग्रा.पं.सदस्य), श्री. राजेंद्र शिरसाठ, श्री.भास्कर शिरसाठा (सदस्य वि.का.सो.), श्री. सतीष मालचे (सदस्य वि.का.सो.), श्री.अरुण शिरसाठ (सदस्य वि.का.सो.), प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे, मुख्याध्यापिका सौ. शितल भामरे (जि.प.मराठी शाळा), श्रीमती जयश्री बोरसे (अंगणवाडी शिक्षिका), श्रीमती जयश्री शिरसाठ (अंगणवाडी शिक्षिका), विटाई ग्रामस्थ, उपप्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व शिबिरार्थी आदी उपस्थित होते.
शिबीर कालावधीत शिबिरार्थांना श्रमसंस्कारासोबत प्रा. डॉ. मिलिंद बी. बचुटे, शिरपूर (व्यक्तीमत्व विकास), प्रा. एस.पी. ढाके, नरडाणा, (राष्ट्र उभारणीत युवकांचा सहभाग), प्रा. एन.एस. पाटील, नरडाणा (संत वाइमय व संत ज्ञानेश्वर), श्री. प्रशांत जाधव, शिदखेडा (एडस् समुपदेशन), डॉ. सौ. युगंधरा सिसोदे, दोंडाईचा (महिला आरोग्य व दंत चिकित्सा), डॉ. मनोजसिंग राजपूत, नरडाणा (साथीचे आजार), प्रा.दत्तात्रय धिवरे,नरडाणा (युवा व राष्ट्र), प्रा.डॉ.सी.एम. जाधव, धुळे, (आपले आरोग्य आपल्या हाती), प्रा.डॉ. संभाजी पाटील, धुळे (भारतीय संविधान), प्रा. इंद्रजितसिंग गिरासे, धुळे (सेंद्रीय शेती), एपीआय श्री. एन. आर. मोरे, नरडाणा (सायबर गुन्हेगारी), प्रा.डॉ. सदाशिव सुर्यवंशी, धुळे (स्यतेचा राजा छत्रपती शिवराय) श्री. जगदीश देवपूरकर, धुळे (आनंदी जीवन), प्रा.डॉ.सुनिल पाटील, धुळे (शाश्वत विकास), आदी तज्ञांचे विविध विषयावर शिबीरार्थींना मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच शिबीरात पाणलोट व्यवस्थापन, जल जमीन व संवर्धन, परिसर स्वच्छता, बेटी बचाओ, बेटी पढाओ, मतदार जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन एडस् जाणीव जागृती आदी उपक्रम राबविले जातील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. यू. जी. पाटील यानी, सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय ढिवरे यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ. एन. के. पाटील यानी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.ए.पी.निकम, प्रा. डॉ. यू. एस. पाटील, प्रा.आर. एस.भदाणे, प्रा.डॉ.सारीका पाटील, प्रा. डॉ. सोनाली धनराज, प्रा. डॉ.अनिता मोरे, प्रा. योगेश्वरी सावंत, प्रा. हर्षा पाटील, प्रा. रोहिनी सिसोदे, प्रा. शिवानी लोहार श्री. आर. ओ. पाटील, सजय बोरसे, शैलेंद्र सिसोदे, शशीकात भामरे, शंकर सिसोदे, फरुक कुरेशी, निखील भावसार, सचिन शिरसाठ, समाधान शिरसाठ, गणेश खैरनार व कैलास पवार यानी परीश्रम घेतले.
0 Comments