शिंदखेडा शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या सुकवद येथील तापी काठावरील विहिरीच्या मोटारीचे वीज कनेक्शन दि. २९ ऑगस्ट २०२५ वीजबील थकल्यामुळे खंडित झाले आहे. या योजनेचे माहे ऑगस्ट २०२५ पासून रु.४३,३५,७७०/- एवढे वीजबील थकीत आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात पाणीपुरवठा होणार कि नाही हयासाठी पाणी जपून वापरा असे शहरातील नागरिकांना आवाहन करत संबधित थकीत बिलाविषयी चौकशी करून योग्य तो मार्ग काढू असा खुलासा पत्रकार परिषदेतुन नगराध्यक्षा कलावती माळी व नगरसेवक प्रतिनिधी यांनी यावेळी पत्रकारांना केला. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस जन संपर्क कार्यालयात शिंदखेडा नगरपंचायत नगराध्यक्षा कलावती माळी सह नगरसेवक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले होती. सदरच्या पत्रकार परिषदेतून खालील महत्त्वपूर्ण गंभीर विषयावर नगराध्यक्षा श्रीमती माळी यांनी खालील प्रमाणे सदर विषयावर आपले म्हणणे मांडले कि,शिंदखेडा शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या सुकवद येथील तापी काठावरील विहिरीच्या मोटारीचे वीज कनेक्शन दि. २९ ऑगस्ट २०२५ वीजबील थकल्यामुळे खंडित झाले आहे. या योजनेचे माहे ऑगस्ट २०२५ पासून रु.४३,३५,७७०/- एवढे वीजबील थकीत आहे.
वीजबील हे नगरपंचायतीच्या नफा फंडातून अथवा १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरले जाते. दरम्यान च्या काळात प्रशासक असलेने निधी अप्राप्त आहे. आणि वीज बिल नफा फंडातून भरण्याबाबत काहीही प्रयत्न झालेले नाहीत.
सद्यस्थितीत शहराला बुराई नदी मधून पाणी पुरवठा होत होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून बुराई बुराई नदीचा जलसाठा वेगाने कमी झाला आहे. परिणामी सुकवद येथील पाणीपुरवठा सुरु करणे अत्यावशक बनले आहे.
तथापी, वीज कनेक्शन जोडले गेले नाही तर, शहराला नियमित पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. पॅनलप्रमुख राकेश माळी, गटातील सर्व नगरसेवक यांनी नफा फंडातून रक्कम रु.१,००,०००/- थकीत वीजबील भरण्याचा सूचना केल्या आहेत. दि. १७/०१/२०२५ रोजी या रकमेचा भरणा केला असून वरील पातळीवरून खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.हयावेळी नगराध्यक्षा कलावती माळी सह नगरसेवक प्रतिनिधी सुभाष माळी, अरुण देसले, नगरसेवक अर्जुन सोनवणे,नगरसेविका कमलाबाई पाटोळे, स्विकृत नगरसेवक प्रा. दिपक माळी, प्रकाश चौधरी,मनिष माळी, वैभव गुरव, पदाधिकारी व कार्यकर्ते आदीसह शहरातील पत्रकार उपस्थित होते. तसेच शहरातील नागरिकांनी सध्या पाणी जपून वापरा असे हयावेळी नगराध्यक्षा यांनी सांगितले. सुमारे ४३ लाखाहुन अधिक रुपायाची वीजबिल थकबाकी असल्याने ऑगस्ट 2025 पासून खंडित करण्यात आला आहे. नगरपंचायत महिन्यानंतर महिने वीज बिल न भरता थकबाकी वाढत गेली तरीही मुख्याधिकारी, प्रशासक गप्प का होते वीज वितरण कंपनीकडून नोटीसा पत्रव्यवहार येत असतानाही केवळ पुढे पाहू च्या धोरणावर कारभार चालवण्यात आला का हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे वीज कनेक्शन तोडले जाईपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना न करणे म्हणजे जनतेच्या पाण्याशी थेट खेळ केल्यासारखे आहे. ४३ लाखांची थकबाकी एका दिवसात निर्माण झाली नाही, मग याआधी जबाबदारी निश्चित का झाली नाही? दोषी अधिकारी,कर्मचारी किंवा पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर कारवाई होणार का, की पुन्हा एकदा प्रकरणावर पडदा टाकला जाणार?
तसेच या गैरकारभारास जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी आता नागरिकांकडून होत आहे. अन्यथा हा प्रश्न पाण्याचा न राहता प्रशासनाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न ठरेल, हे लक्षात ठेवावे लागेल.
✍️ यादवराव सावंत शिंदखेडा प्रतिनिधी
0 Comments