शिंदखेडा (यादवराव सावंत ) प्रतिनिधी :- येथील विश्वास एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन संचलित व्ही.के.पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे दिनांक 17 जानेवारी रोजी भरारी 2026 हा वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मीनाताई विश्वास पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कक्कूबेन पटेल उपस्थित होत्या.तसेच शिंदखेडाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रीमती कलावती ताई माळी, बोरा इंग्लिश मीडियम स्कूल चे चेअरमन श्री सुरेंद्र जी बोहरा माजी गटनेते व विद्यमान नगरसेवक श्री अनिल वानखेडे माजी नगरसेवक उल्हास देशमुख माजी उपसभापती श्री विश्वनाथ पाटील,रोटरी स्कूलचे प्राचार्य श्री बारीक सर यांसह संस्था उपाध्यक्ष श्रीमती स्वाती पाटील संचालक श्रीमती काजल पाटील श्रीमती माधुरी पाटील श्री अतुल सिंह,श्री राज पाटील,श्री रोहित पाटील यांसह गावातील राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व पालक उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी भरारी 2026 साठी सह्याद्रीचा सिंह ही थीम घेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगात गाजवलेले शौर्य स्वाभिमान व स्वराज्य स्थापना याची ओळख विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलागुणांमधून पात्र सादर करत करून दिली.विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची आठवण व शिवरायांची प्रेरणा रुजवण्याची कार्य व्हावे यासाठी ही थीम घेण्यात आली होती असे प्रतिपादन संचालक श्रीमती माधुरी पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेक सोहळा पर्यंतचा प्रवास अत्यंत प्रभावी व भावपूर्ण पद्धतीने सादर केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाला व त्यांच्या कलागुणांना सर्व मान्यवरांसह नागरिकांनी प्रशंसा करत दाद दिली.
याप्रसंगी मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.तसेच सुरुवातीस व्ही. के पाटील प्री प्रायमरी स्कूल चे चिमुकल्यांनी सदर केलेल्या नृत्याने व त्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थियाची मने जिंकली.उत्कृष्ट नियोजन व प्रभावी सादरीकरणामुळे कार्यक्रमाला पालकांकडून व प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
शिंदखेडा शहरांमध्ये स्थापित असलेल्या व्ही के पाटील इंटरनॅशनल स्कूल चा इतिहास व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य आणि विद्यार्थी प्रगती याचा अहवाल प्राचार्य श्री मनोज पाटील यांनी आपल्या प्रस्तावनेतून करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववीच्या विद्यार्थिनी कुमारी हंसिका चौधरी, मनस्वी पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार प्री प्रायमरी प्रभारी आशा पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
0 Comments