Header Ads Widget

७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

=======================
विधायक शिक्षण समिती संचलित साने गुरुजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पाष्टे (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिक संरक्षण सोसायटीचे व्हा. चेअरमन सन्माननीय श्री. मधुकर रोकडे सर होते. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री. आबासाहेब श्रीराम जवागे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. ध्वजारोहणानंतर इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर कवायतींचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांच्या या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आबासाहेब श्रीराम पाटील यांच्याकडून ₹२१००/- रोख बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्यात आले. याशिवाय गावातील ग्रामस्थ व नागरिकांनीही विद्यार्थ्यांना मोठ्या मनाने रोख बक्षिसे देत त्यांचे कौतुक केले.

यावेळी ‘सुजान नागरिक’ या वृत्तपत्राचे संपादक श्री. अण्णासाहेब भालचंद्र शिरसाठ यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल नुकताच प्राप्त झालेल्या ‘खान्देश भूषण’ पुरस्काराबद्दल संस्थेच्या वतीने अध्यक्षांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण क्रीडा स्पर्धेत यश विजेता ठरलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ पार पडला. शाळेच्या शैक्षणिक उन्नतीबद्दल जिव्हाळा असलेल्या समाजभिमुख दात्यांकडून प्राप्त झालेली सन्मानचिन्हे व रोख बक्षिसे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष, श्री. श्रीराम पाटील, माजी सरपंच श्री. मधुकर पाटील, श्री. लक्ष्मण पाटील, श्री. चंद्रशेखर शिरसाठ, पत्रकार श्री भालचंद्र शिरसाठ श्री. सतीश पाटील, श्री. भास्कर पाटील, मुख्याध्यापिका श्रीमती पी. एस. पाटील मॅडम, श्री रघुनाथ महाजन श्री. रवींद्र साळुंखे, माजी शिक्षक श्री. एम. एस. पाटील,  व श्री.जे.ए.शिरसाट सर, माजी मुख्याध्यापक श्री. ए. बी. पाटील, श्री. तुकाराम महाजन, श्री. काशिनाथ देसले, श्री. हंसराज शिरसाट, श्री. पूनम ठाकरे, श्री. रमजान खाटीक, श्री. नाना पाटील, श्री. कपिल पाटील, श्री. पंकज सोनवणे, श्री. संजय पाटील, श्री. संतोष पाटील, श्री. राहुल पाटील, श्री. योगेश सोंजे, श्री. विनोद पाटील, श्री. विजय पाटील, श्री अशोक शिरसाठ श्री. गारशा पावरा यांच्यासह गावातील ज्येष्ठ व युवा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री. वाय. एस. सनेर व श्री. पी. एस. जाधव यांनी केले. प्रास्ताविक व संविधान परिचय श्री. एन. एस. बैसाणे यांनी करून दिला, तर आभारप्रदर्शन श्री. एस. एल. ठाकरे यांनी केले.
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments