Header Ads Widget

बेटावद येथे श्री. फ. मु.ललवाणी माध्यमिक व डॉ. दादासाहेब श्री तू गुजर उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


बेटावद प्रतिनिधी 

बेटावद येथे श्री. फ. मु. ललवाणी माध्यमिक  व डॉ. दादासाहेब श्री. तू.गुजर उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी **जिल्हा परिषद माजी सदस्य मंगेश पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण** करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांनी परिसर दुमदुमून टाकला. शैक्षणिक, क्रीडा व विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला व त्यांना बक्षिसे देण्यात आली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करत मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले एनसीसी, स्काऊट व गाईड पथकांचे शिस्तबद्ध संचलन. त्यांच्या दमदार संचलनाने उपस्थितांची मने जिंकली असून त्यांना उपस्थितांकडून भरभरून वाहवा मिळाली.

यानंतर एनसीसी, स्काऊट व गाईड पथकांनी ग्रामपंचायत बेटावद येथे ध्वजारोहण केले. तसेच शहीद जवान शशिकांत पवार यांच्या स्मारकास मानवंदना देत त्यांच्या बलिदानाला आदरांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शिस्त व सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली.

Post a Comment

0 Comments