Header Ads Widget

*जनता हायस्कूल मध्ये 77 वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा*

 *जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथे 77 वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण माजी आर्मी नायक श्री शशिकांत भगवान शिरसाठ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी संस्थाअध्यक्ष तसेच बांधकाम सभापती श्री मनोहर गोरख पाटील,संस्थेचे खजिनदार श्री देवेंद्र पोपटराव बोरसे माजी मुख्याध्यापक श्री बी.बी मराठे श्री के आर पाटील माजी शिक्षक श्री आर एस सावळे शिक्षकेतर कर्मचारी श्री बालमुकुंद सत्तालीस,श्री टी जी गिरासे प्राचार्या श्री एस.एस.पाटील वरिष्ठ लिपिक श्री किशोर गोरख पाटील श्रीमती मायादेवी शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते.  
  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांनी वाद्याच्या तालावर राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देत संचलन सादर करत राष्ट्रीय गीतावर कवायतीचे हात सादर केले.
   तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधून गायत्री माता प्री प्रायमरी स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर  गीतांवर आधारित सुंदर नृत्य सादर करत मान्यवरांची मने जिंकली. महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या बालविवाह निर्मूलन, असाक्षर मुक्त गावाची शपथ व सामूहिक संविधान म्हणत विद्यार्थ्यांना कडून प्रतिज्ञा घेण्यात आली. 
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार श्री जे.डी बोरसे यांनी मानले.                              
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री डी एच सोनवणे,श्री एस के जाधव,श्रीमती एन जे देसले श्रीमती व्ही एच पाटील श्रीमती उज्वला बाशिंगे, श्रीमती भाग्यश्री सोनवणे, सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments