Header Ads Widget

*कल्पतुळशी शैक्षणिक संकुलात महिला पालकांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन.*

     शिंदखेडा (यादवराव सावंत ) प्रतिनिधी :- येथील कल्पतुळशी शैक्षणिक संकुलातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विध्यार्थ्यांच्या पालकांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष तुळशीराम वाडीले, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिंदखेडा नगर पंचायतीच्या लोकनियुक्त नगरध्यक्षा  कलाताई सुकलाल माळी, नगरपंचायत नगरसेवक वंदना चेतन गिरासे,माजी पंचायत समिती सभापती  छायाताई रणजित गिरासे, नगरसेवक  सुयोग भदाणे, चिमठाणे गावाचे सरपंच  छोट्या बाई दरबारसींग गिरासे, यांच्या हस्ते विद्येचे दैवत सरस्वती माता, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाचे अतिथी भाऊसाहेब रणजित गिरासे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर दरबारसिंग गिरासे, चेतन परमार यांनी आपल्या मनोगतात संस्था व शाळेच्या कार्याविषयी कौतुक केले. अजय भोई, कल्पना वाडीले, स्वाती वाडीले,  किशोर गिरासे हे उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमाच्या प्रास्तविकेत संस्थेचे अध्यक्ष प्रशांत वाडिले यांनी संस्थेचे कार्य बद्दल व संस्थेचे विझन  मान्यवरां समोर विषद केले. शाळेचे मुख्याध्यापक जी. एम. बच्छाव यांनी संस्थेने शाळेसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधे बद्दल उपस्थिताना माहिती दिली व संस्थेचे आभार मानले. महिलांसाठी घेतलेल्या स्पर्धेत बादलीत बॉल टाकणे या खेळात चिमठाणे येथील अनिता राकेश भिल, पाण्याची बॉटल उचलणे कोकिळा सुनील ककराळे, फुगा मध्य हवा भरून फोडणे  मध्य सोनेवाडीच्या मनीषा विकास सोनवणे, स्ट्रा केसात लावणे या खेळात टेमलाय च्या गुड्डीबाई दशरथ भिल, आणि संगीत खुर्ची या खेळात पिंप्री येथील  सोनल भटू पाटील या विजयी झाल्या या सर्व विजेत्यांचा  मान्यवरांच्या हस्ते पैठणी साडी व पुष्प गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, उपस्थित सर्व महिलांना हळदी कुंकू चे औक्षण करून त्यांना आकर्षक भेट वस्तू देऊन गुलाब पुष्पाने सन्मान करण्यात आला या सर्व  खेळांचे नियोजन शाळेतील शिक्षिका श्रीमती एम के गिरासे, श्रीमती जी. एस. पाटील,  एस. एस. शिंदे,  पी. पी. मराठे, ए. पी. पाटील, एम. व्ही बैसाणे,  एम. बी. रामोळे,बी. पी. बागुल. व्ही एम मराठे, सी. एस. मराठे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका श्रीमती आर सी पवार यांनी केले, आभार श्रीमती एन ए पाटील यांनी मानले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के. एस. तमखाने,  ए. व्ही. गिरासे,  बी. एस. मराठे,के. आर. म्हसदे,एस. आर. चव्हाण यांनी परिश्रम घेतले. कर्यक्रमासाठी पंचक्रोशीतल नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments