शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
नरहाणा येथील ग्रामिण विकास शिक्षण प्रसारक मंडळ, नरडाणा संचलित कै. एम. डी. सिसोदे उर्फ भाऊसाहेब कला, वाणिज्य व डॉ. ऊषाताई प्रसादराव तनपुरे विज्ञान आणि सौ.आर.एम. सिसोदे कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण विभागातर्फे थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ. पी.एस.गिरासे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन व माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. यू. जी. पाटील, उपप्राचार्य डॉ. एन. के. पाटील, उपप्राचार्य प्रा. एस. टी. भामरे, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. राहुल भदाणे, आर. ओ. पाटील, दिनेश बोरसे, प्रशांत सिसोदे, संदीप निकम, संजय बोरसे, शैलेंद्र सिसोदे, शंकर सिसोदे व फारुक कुरेशी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments