Header Ads Widget

_*सर्व भारतीय सणांमुळे पर्यावरण संरक्षण*_ _-श्री प्रफुल्ल साळुंखे_


,* मालपूर. प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे"जल संधारणामुळे परिसंस्थेचा समतोल राखला जातो, मृदसंधारण, वृक्ष लागवड व सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचे पर्यावरण सुरक्षित राहते. जंगलामुळे जैवविविधतेचे संवर्धन होऊन पर्यावरण समृद्ध होते. प्राणी संरक्षणामुळे परिसंस्थेचा नैसर्गिक समतोल टिकून राहतो. पर्यावरण पूरक सवयी जनतेने स्वीकारल्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण होते. त्यामुळे जल, जमीन, जंगल, जनावर(प्राणी) आणि जनता (मानव) यामुळे पर्यावरण संरक्षण होते. म्हणून हे पाच 'ज' घटक पर्यावरण संरक्षण जसे करतात तसेच सर्व भारतीय सणांच्या मुळाशी विज्ञान आहे, त्यामुळे भारतीय सणांमुळेही पर्यावरण संरक्षण होते" असे विचार श्री प्रफुल्ल साळुंखे यांनी उपस्थित राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील स्वयंसेवकांना केले. श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल बी.एड. कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर मालपूर येथे सुरू आहे. तेथील वैचारिक प्रबोधनांतर्गत "पर्यावरण संरक्षण" या विषयावर त्यांनी स्वयंसेवकांना चर्चेद्वारा उद्बोधन केले.
शिबिराच्या तिसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थना घेण्यात आली. त्याचे सूत्रसंचालन दीपमाला भामरे यांनी केले. त्यानंतर कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एम. एस. उभाळे यांनी योग व प्राणायाम यांचा सराव घेतला. त्यानंतर मालपूर मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा फुले पुतळा व अहिल्याबाई होळकर पुतळा या सर्व पुतळ्यांची स्वच्छता स्वयंसेवकांनी स्वयंस्फुर्तीने केली. त्यामुळे सेवाभाव व सांस्कृतिक वारशाचे जतन या मूल्यांचे विकसन स्वयंसेवकांमध्ये निर्माण होण्यास मदत झाली.
 त्यानंतर दुपारच्या स्नेहभोजनानंतर प्रदूषण या विषयावर प्रियंका बाई पाटील यांच्या गटाने गटचर्चा केली.त्यानंतर श्री प्रफुल्ल साळुंखे यांनी पर्यावरण संरक्षण या विषयातून स्वयंसेवकांना विविध प्रश्न विचारून, संप्रेषण पद्धतीचा संमर्पक वापर करून स्वयंसेवकांना विचार प्रवृत्त केले. त्यानंतर प्रा. आर.बी. राजपूत यांनी पाणलोट व्यवस्थापन या विषयांतर्गत जलसंधारणाच्या विविध शास्त्रीय पद्धती स्वयंसेवकांना समजून दिल्या. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एम. एस. उभाळे यांनी दोन्ही मान्यवरांचा परिचय करून दिला तसेच आभार अभिव्यक्ती केली.
शिबिराच्या कार्यक्रमाच्या नियोजनाचे मार्गदर्शन प्राचार्य पी.डी.बोरसे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.एम.एस.उभाळे, प्रा.रवींद्र पाटील, प्रा.निशा ठाकूर, प्रा.रेवती बागुल, प्रा.सुनीता वळवी व प्रा.आर.एस‌.वळवी यांनी प्रयत्न केले. तर प्रशासकीय सेवक शंकर गिरासे, कृष्णा बागुल,अमर राजपूत व वीरपाल गिरासे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments