Header Ads Widget

शिंदखेडा नगरपंचायतच्या विषय समितीच्या सभापतीपदी भाजपाचे वर्चस्व : उमेदवार बिनविरोध निवडराष्ट्रवादीचे सभापती पदी उमेदवारांचे अनुमोदक नसल्याने अर्ज बाद




प्रतिनिधी l शिंदखेडा :- शिंदखेडा नगर पंचायतीच्या विषय समित्यांच्या निवडणुका आज बिनविरोध झाल्या. यामध्ये पाच विषय समित्यांपैकी पाच समित्यांवर भाजपने वर्चस्व राखले. या निवडणूक प्रक्रियेत तहसीलदार नितीनकुमार देवरे हे पीठासन अधिकारी म्हणून उपस्थित होते. नगरपंचायतीच्या महात्मा जोतीराव फुले या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.नियोजन व विकास समिती ही उपनगराध्यक्षांसाठी पदसिद्ध समिती म्हणून गठीत करण्यात आली. या समितीच्या सभापतिपदी भाजपाचे उपनगराध्यक्ष उदय अरुण देसले यांची निवड झाली तर भाजपच्या खालील चार नगरसेवकांना बांधकाम सभापतीपदी मनोहर गोरख पाटील,पाणीपुरवठा सभापतीपदी श्रीमती पुनम गोविंद मराठे, महिला बालकल्याण सभापतीपदी
श्रीमती अरेफाबी अबु तालिब कुरेशी,स्वच्छता व आरोग्य सभापतीपदी श्रीमती संगीता चंद्रकांत भील आदींची निवड करण्यात आली
 


मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर सर्व नियमांचे वाचन केले. त्यानंतर समिती सदस्यांची संख्या निश्चित करण्यासाठी चर्चा झाली. सदस्यसंख्या पाच असावी असा ठराव मांडला गेला.

शिंदखेडा येथील नगरपंचायत मध्ये आज स्थायीसह विषय समितीची निवडणूक होती त्यात  स्थायी समिती व नियोजन समिती हे पदसिद्ध असल्याने उर्वरित चार समिती तर्फे भाजपा कडून चार नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते त्यात त्यांनी अनुमोदक नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व सभापती पदाचे अर्ज बाद केल्याने भाजपाचे सर्व सभापती बिनविरोध झाले आहेत या  निवडीच्या कामकाज वेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नितीनकुमार देवरे, मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, नगरपंचायत चे प्रशासन प्रमुख सचिन वाघ , गणेश पवार, लिपिक विवेक डांगरीकर यांनी सहाय्य केले.निवडीनंतर भाजपाकडून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली 


विषय समित्या खालीलप्रमाणे

*स्थायी समिती* 
कलावती सुकलाल माळी - सभापती 
सदस्य- उदय अरुण देसले 
मनोहर गोरख पाटील
पूनम गोविंद मराठे
संगीता चंद्रकांत भिल
कुरेशी आरिफाबी अबुतालिफ


*नियोजन व विकास समिती*
उदय अरुण देसले - उपाध्यक्ष तथा सभापती 
सदस्य देसले दीपक सुधाकर
राजपूत अश्विनी संदीप
सुनीता अरुण देसले
अर्जुन रामसिंग भिल


*सर्वजनिक बांधकाम समिती* 
मनोहर गोरख पाटील - सभापती
सदस्य- भदाणे सुयोग जगतराव
सकट ज्ञानेश्वर बबन
सुनीता अरुण देसले
 रजूबाई सुभाष माळी



*पाणीपुरवठा व जल निस्सारण समिती* 
श्रीमती पूनम गोविंद मराठे - सभापती

सदस्य-गिरासे वंदना चेतन
सोनवणे शीतल गुलाब
पुष्पा गोपाळराव सोनवणे
कमलबाई रविंद्र पाटोळे


*स्वछता वैदक आणि सार्वजनिक आरोग्य समिती* 
सभापती- संगीता चंद्रकांत भिल
सदस्य-सकट ज्ञानेश्वर बबन
गिरासे वंदना चेतन
पुष्पा गोपाळराव सोनवणे
अर्जुन रामसिंग भिल



*महिला व बालकल्याण समिती* 
सभापती :- कुरेशी आरिफाबी अबुतालिफ
सदस्य- राजपूत अश्विनी संदीप
सोनवणे शीतल गुलाब
रजूबाई सुभाष माळी
कमलबाई रवींद्र पाटोळे
यांची निवड करण्यात आली 


 आज शिंदखेडा शहरातील विषय समित्यांची निवड होती त्यात भारतीय जनता पार्टीचे सर्व समित्यांवर सभापती पदांची बिनविरोध निवड झाल्याने खऱ्या अर्थाने भाजपाचे वर्चस्व सिद्ध झाले.शिंदखेडा शहराने मा ना जयकुमार भाऊ रावल यांच्या विकास कामांवर विश्वास व्यक्त करत भाजपाचे ११ सदस्य निवडून आणले मा आ जयकुमार भाऊ रावल यांनी आज पाचही समितीच्या सभापती पदावर शहरातील विविध जाती-धर्मातील सर्व सदस्यांना न्याय देत एक सोशल इंजिनिअरिंगचा उत्तम नमुना या ठिकाणी दाखवलेला आहे त्यामुळे मा ना जयकुमार  भाऊ रावल व शिंदखेडा शहरातील तमाम जनतेचे सर्व शहराच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करत आणि सर्व नवनियुक्त सभापतींना शिंदखेडा शहराच्या विकासासाठी हार्दिक शुभेच्छा - जिल्हा सरचिटणीस शहर प्रभारी डी एस गिरासे

Post a Comment

0 Comments