Header Ads Widget

*काशी येथील मनकर्णिका घाट उध्वस्त करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती आड करण्याच्या प्रयत्न केल्याबद्दल प्रांत अधिकारी साहेब यांना निवेदन*

      
        *अमळनेर* - राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्ताने संपूर्ण भारतीय समाज एक संधपणे त्यांच्या कार्याचा गुणगौरव करताना दिसून आला  एकमेकांच्या सण समारंभात सहभागी होणारा समाज आज अचानक आपल्या वाराणशी( काशी) येथे बुलडोझर वृत्तीने दुखावला गेला  संपूर्ण भारताच्या आध्यात्मिक एकतेचे प्रतीक म्हणून वाराणशी या तीर्थक्षेत्रासह संपूर्ण भारतभर राजमाता  अहिल्यादेवी होळकर यांनी भव्य दिव्य अशी विशाल शाश्वत कामे  केली. त्यात प्रामुख्याने रस्ते, विहिरी ,घाट, धर्मशाळा, धरणे ज्यामुळे  तत्कालीन  सारा समाज सुखावला होता.  आज पर्यंत अनेक  नैसर्गिक संकटे आली तरी पण अहिल्यादेवी चे कार्य नामशेष झाले नाही  . आपण मात्र यांत्रिक राक्षसांचा  वापर करून अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस,  त्यांनी निर्माण केलेल्या कार्यास ज्याचे जतन व संवर्धन करणे हे पुरातत्व विभागाचे आख्यारीत असताना त्यांची मुलाहिजाही   न ठेवता फक्त एक फरशी आपल्या नावाची लावण्यासाठी आपण इतिहासाच्या सुवर्ण विटा मातीमोल केल्या म्हणून धनगर समाजासह भारतातील तमाम जाती, धर्म ,पंथाच्या लोकांनी निषेध व्यक्त केला .तरी खालील सह्या करणारे विविध जाती धर्माचे सजग नागरिक  जिल्हा काँग्रेस सरचिटणीस व म.सा.प तालुकाध्यक्ष संदीप घोरपडे सर ,मौर्य क्रांती संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत ,काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रा.बी.  के. सुर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेल तालुकाध्यक्ष एस. सी  तेले ,युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक पवार, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष शहराध्यक्ष देवा लांडगे ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख( उबाठा) नितीन निळे , हमाल मापाडी संघटना तालुका अध्यक्ष रमेशदेव   शिरसाट,  काँग्रेसचे शहराध्यक्ष   गजेंद्र साळुंखे ,मौर्य क्रांती संघाचे तालुकाध्यक्ष गोपीचंद शिरसाट, खानदेश साहित्यिक संघाचे जिल्हाध्यक्ष व कवी शरद धनगर, मच्छिंद्र लांडगे, जिभाऊ कंखरे,  लोटन चौधरी ओबीसी  परिषदेचे डी.ए. सोनवणे ,स्टडी  सेंटर संचालक मौलाना रियाज शेख ,प्राध्यापक शाम पवार, एडवोकेट तिलोतमा पाटील, एडवोकेट चारु शिंदे, रज्जाक  शेख,  शरद पाटील, राजेंद्र पाटील, विष्णू पाटील ,जयदीप सिसोदिया, किशोर पवार, भानुदास सैंदाणे, डॉक्टर महेश पाटील किशोर धनगर, आर.टी . पाटील, गणेश कासार,  ए सी  सोनवणे, एच .टी . नंदवे ,एस . ए .साळुंखे,  ए.एस.पाटील,  पी.पी.माळी, एस .व्ही.  सैय्यद,अतुल धनगर,हाजी दबीर पठाण,  भगवान संदानशिव,  डॉक्टर रवींद्र पाटील, जयवंत पवार, सुधाकर भैसे,  अशोक पाटील, प्रकाश पाटील

Post a Comment

0 Comments