बेटावद प्रतिनिधी
खान्देशातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बेटावद येथील आई सतीमाता यात्रोत्सव आज, रविवार दि. १८ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात सुरू झाला सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत महापूजा आणि भाविकांच्या सुविधेसाठी 'पाणीपोई'चे उद्घाटन करण्यात आले
आज सकाळी ८:३० वाजता बेटावद ग्रामपंचायतीचे सरपंच मंगलचंद जैन तसेच ग्रामपंचायत सदस्य महेंद्र माळी यांच्या हस्ते आई सतीमातेची विधीवत महापूजा व आरती करण्यात आली यावेळी मंदिर परिसरात भाविकांची व राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, बेटावद व परिसरातील नागरिकाची मोठी उपस्थिती होती.
माजी उपसरपंच गणेश माळी व निसर्ग मित्र संघटनेतर्फे पाणीपोईची व्यवस्था
यात्रेसाठी येणाऱ्या हजारो भाविकांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासू नये, यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही बेटावद नगरीचे माजी उपसरपंच गणेश माळी व निसर्ग मित्र संघटनेचे तालुकाध्यक्ष आर, आर,सोनवणे सर यांच्या विशेष सहकार्यातून पाणीपोईची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे या पाणीपोईचे उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले गर्दी पाहता, सामाजिक बांधिलकीतून केलेल्या या कार्याचे भाविकांकडून कौतुक होत आहे
मिरवणूक आणि मनोरंजनाची मेजवानी
यात्रोत्सवानिमित्त आज दुपारी २:०० वाजता तगतरावाची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे तसेच रात्री ९:०० वाजता भाविकांच्या मनोरंजनासाठी 'रतनभाऊ आणि चि. सोमनाथभाऊ नगरदेवळेकर' यांचा आदर्श लोकनाट्य तमाशा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण
न्यू प्लॉट नरडाणा रोडवरील सतीमाता मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे परिसरात विविध प्रकारची खेळणी, हॉटेल्स, पाळणे आणि गृहउपयोगी वस्तूंची दुकाने थाटली असून भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे
शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
हा यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी सती माता उत्सव समितीचे यशवंत सोनगडा, रविंद्र माळी, रतिलाल भोई, रविंद्र पवार, विजय माळी, हरी देशमुख, सतिश पाटील, भिका कोळी, जगन कोळी, सुरेश कोळी, प्रल्हाद माळी आदि परिश्रम घेत आहेत
परिसरातील सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments