Header Ads Widget

प्रतापूर तालुका तळोदा येथील दीपराज राणा देश सेवेसाठी सज्ज

-=-=-=-=-=-===-=-=-=-=-=-==-=-=-
 शिंदखेडा प्रतिनिधी प्रतापूर तालुक्यात तळोदा येथील रहिवासी दीपराज राणा याचे बीएसएफ जवान म्हणून देशसेवेसाठी नियुक्ती झाली आहे 
    शिंदखेडा हे आजोळ असून मामाच्या गावात त्याने इयत्ता दहावी आणि बारावीचे शिक्षण घेतले असून आज तो बीएसएफ च्या माध्यमातून देश सेवेसाठी सज्ज झाला आहे अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देशाविषयीचा अभिमान देशाचे संरक्षण ही संकल्पना मनाशी निर्माण केली आहे दोन भावंड व आई वडील असा त्याचा परिवार दीपराज हा लहान मुलगा पण आपल्या मुलाला देश सेवेसाठी पाठवण्याचा अभिमान आईने मनाशी निर्माण केला व आज मोठ्या अभिमानाने तो देश सेवेसाठी सज्ज झाला . आईने खंबीरपणे उभे राहून त्याच्यावर योग्य असे संस्कार केलेत कडाक्याची थंडी असो रणरणते ऊन असो आता तो देश सीमेवर संरक्षण करणार आहे आज दीपराजने घरादाराचा त्याग करत देशसेवा संकल्पित केली आहे त्याचे आई आणि वडील प्रतापूर तालुका तळोदा येथे फॉल पिको चे काम करतात मात्र लहानपणापासूनच दीपराज भूपेंद्रसिंह राजपूत या मामाच्या घरी राहून शिक्षण पूर्ण केले अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून दीपराजने देश सेवेचा मार्ग स्वीकारला त्याच्या हातून चांगली देशसेवा घडो अशा शुभेच्छा शिंदखेडा मतदार संघांचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे पणन व राज शिष्टाचार तथा धुळे जिल्हा पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल  यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तर शहरातील नागरिकांसह मित्रपरिवार व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघानेही शुभेच्छा दिल्या आहेत बी एस एफ च्या माध्यमातून देश सेवेमध्ये असणाऱ्या दिपराज ने निर्व्यसनी राहावे असा संकल्प करावा

Post a Comment

0 Comments