दसवेल ता शिंदखेडा येथे संत बलजीतसिंहजी महाराज यांच्या प्रेरणेने विश्व मानव रूहानी केंद्रातर्फे नि:शुल्क चिकित्सा शिबिर मा जि प सभापती सौ संजीवनी संजय सिसोदे. यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. विश्व मानव रुहानी नोंदणीकृत संस्था 2005 पासून संपूर्ण देशभर वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात निस्वार्थी वृत्तीने मोफत सेवाकार्य करत आहे. संस्थेचे मुख्यालय हरियाणा राज्यात नानकपुर - पंचकुला येथे आहे. भारतात 259 मानव केंद्रा मार्फत या संस्थेचे मानवसेवा कार्य सुरू आहे. ही सर्व समाजसेवा बलजीत सिंहजी महाराज यांच्या प्रेरणेने निरंतर सुरू आहे.
येथील आरोग्य तपासणी शिबिरास ग्रामपंचायत दसवेल व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य मिळाले. सेवार्थी डॉक्टर म्हणून नरडाणा प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ असिफ कच्ची,डॉ जगजीत रजपूत व डॉ शिवम शिरसाट यांनी सेवा दिली.
या प्रसंगी दसवेल गावाचे सरपंच सौ प्रतिभा ज्ञानेश्वर पवार,मा सरपंच श्री रमेश आप्पा पाटील, मा सरपंच श्री वसंत पाटील, श्री ज्ञानेश्वर पवार, मा उपसरपंच श्री कांतीलाल पाटील,
श्री अनिल पिंपळीकर, होळ मा सरपंच श्री टी.के.पाटील सर, टेंमलाय मा सरपंच श्री प्रताप आप्पा, नरडाणा मा उपसरपंच श्री लखन नेतले, श्री अँड अमोल पाटील, श्री हेमंत वानखेडे, श्री संदीप पाटील व मान्यवर हजर होते.
श्री सिद्धार्थ सिसोदे. यांनी दसवेल ग्रामपंचायत व मानव रुहानी केंद्रातील निस्पृह आरोग्य सेवकांचे आभार मानून, प्रत्येक शिबिरास आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
0 Comments