दसवेल (ता. शिंदखेडा) |
जनहित सामाजिक बहुउद्देशीय संस्था, दसवेल यांच्या वतीने जि. प. मराठी शाळा, दसवेल येथे २६ जानेवारी २०२६ रोजी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची भेट देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल माधवराव पिंपळीसकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त केले.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शाळा हे देशाचा कणा असून, विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गापासूनच संविधानाची ओळख व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळेच आपण निर्भीडपणे जीवन जगू शकतो, तसेच संविधानातील मूल्ये आपल्या आयुष्यात कशी आचरणात आणावीत, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमास जि. प. शाळेचे मुख्याध्यापक श्री. दौलत रघुनाथ इंदाईत, उपशिक्षक श्री. जितेंद्र पाटील, सरपंच सौ. प्रतिभा पवार, श्री. ज्ञानेश्वर पवार, सौ. भावना महाले, रवींद्र महाले, अंगणवाडी कर्मचारी, महिला भगिनी, आशा वर्कर तसेच ग्रामस्थ राकेश पाटील, हेमंत पाटील, हिरामण पाटील, गणेश मोरे, देविदास सेमी, चतुर पाटील, किशोर पाटील, संजय भाऊ फौजी, श्री. मोतीराम पिंपळसकर, दिनकर पाटील, कांतीलाल पाटील आदींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments