Header Ads Widget

पालकमंत्री जयकुमार रावल यांचा शिंदखेडा शहर भाजपा व परिसरात विविध कार्यक्रमानी वाढदिवस साजरा शिंदखेडा भाजपा कार्यालयात हेल्मेट वाटप

                    

प्रतिनिधी l शिंदखेडा :-महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांचा वाढदिवस शिंदखेडा शहर भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रम साजरा करित परिसरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडुन देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिंदखेडा शहर भाजपा कार्यालयात नोंदणी केलेल्या कॉलेजचे विद्यार्थी व नागरिकांना हेल्मेट वाटप करण्यात आले. अपघाताचे मोठ्या प्रमाणात वाढ होताना समोर आल्याने त्यातून सुरक्षा व्हावी हया हेतूने लोकनेते, उदयोजक सरकारसाहेब रावल यांच्या संकल्पनेतुन शिंदखेडा मतदार संघात दोन हजार शालेय विद्यार्थी व नागरिकांना हेल्मेट वाटप केले. त्यात शिंदखेडा शहर कार्यालयात देखील हेल्मेट वाटप करण्यात आले. हयावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व स्विकृत नगरसेवक रावसाहेब अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष उदय देसले, गटनेते चेतन परमार, शहराध्यक्ष संजयकुमार महाजन, नगरसेवक सुयोग भदाणे,मनोहर पाटील,ज्ञानेश्वर सकट, नगरसेवक प्रतिनिधी दादा मराठे,  गुलाब सोनवणे, , रमेश भामरे, प्रकाश पाटील, पंडित फुले,अतुल बोरसे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचप्रमाणे अशोक सिनेप्लेस मध्ये माजी सरपंच प्रल्हाद पाटील उर्फ भावडू यांनी वन टु चा चा चा हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे औचित्य साधत ना. जयकुमार रावल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सह शिंदखेडा येथील संगीत अनिल पाटील यांनी सदरच्या चित्रपटात तिहेरी भुमिका निभावली त्याबद्दल स्वागत कौतुक सोहळा संपन्न हयावेळी भाजपचे रावसाहेब अनिल वानखेडे, उपनगराध्यक्ष उदय देसले, गटनेते चेतन परमार, शहराध्यक्ष संजयकुमार महाजन, जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी सह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच प्रभाग दहा चे नगरसेवक सुयोग भदाणे यांनी कै. रत्नाबाई भिमराव जहागीरदार अपंग निवासी शाळेत ना. जयकुमार रावल यांच्या वाढदिवसा निमित्त गटनेते चेतन परमार व नगरसेवक सुयोग भदाणे यांच्या हस्ते फळ व बिस्कीट वाटप केले हयावेळी नगरसेवक सुयोग भदाणे व मित्र परिवार उपस्थित होते. प्रभाग क्र दोन च्या नगरसेविका श्रीमती शितल गुलाब सोनवणे यांनी जिल्हा परिषद केद्रिय प्राथमिक शाळा 2,4,5 व उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले. हयावेळी गुलाब सोनवणे, भुपेद्र देवरे, पंडित फुले, एकनाथ ठाकरे, कैलास मालचे, सुकदेव सोनवणे, शाम सोनवणे सह शिक्षक व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचप्रमाणे निरघुडी येथील भाजपचे सामाजिक कार्यकर्ते अमोल राजपूत यांनी गावात रक्तदान व महा आरोग्य शिबीर आयोजित केले होते. त्यात ५२ रक्तदात्यानी रक्तदान करत महा आरोग्य शिबिरात मधुमेह तपासणी,थायरॉईड, रक्तदाब तपासणी सह विविध आजाराच्या तिनशे हुन अधिक गरजु नागरिकांनी लाभ घेतला. त्यासाठी अमोल राजपूत युवा मंच निरगुडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तसेच धमाणे येथील भाजपचे विशाल माळी यांच्या आयोजनातुन मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. त्यासाठी ग्रामस्थ नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. असे शिंदखेडा शहर भाजपा व परिसरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments