Header Ads Widget

कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकताच "राज्य क्रीडा दिन" मोठ्या उत्साहात साजरा

सुजाण नागरिक प्रतिनिधी श्री.सी.जी.वारूडे 
दिनांक -१६/०१/२०२६ शुक्रवारी 
         शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात नुकताच "राज्य क्रीडा दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
        या बाबत सविस्तर वृत्त असे की, माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला.
    आपल्या भारत देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे "महान मल्ल" खाशाबा दादासाहेब जाधव यांचा आज १५जानेवारी हा जन्मदिवस ...हा दिवस शासनाच्या वतीने "महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन" म्हणून साजरा केला जातो.
     यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष
 विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक 
आबासो.श्री एस ए कदम सर व क्रीडा शिक्षक श्री.सी.जी.वारुडे यांच्या हस्ते कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे व खेळ साहित्य पुजा करण्यात आले.त्यानंतर आदरणीय मुख्याध्यापक आबासाहेब श्री एस ए कदम यांनी क्रीडा शिक्षक - श्री.सी.जी.वारुडे सर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
        नंतर खेळाडू विद्यार्थ्यांनी खेळ खेळतांना आलेले स्वानुभव व राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या उत्कृष्ट खेळाडूंविषयी मनोगत व्यक्त केलेत व विद्यालयातील  क्रीडा शिक्षक श्री.सी.जी.वारूडे व श्री.एस.बी.भदाणे यांनी ही कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनशैली तसेच ऑलिम्पिक व देशपातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंविषयी मनोभाव व्यक्त केलेत.
     शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक आबासो.एस.ए.कदम.यांनी महान कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांचा (१५जानेवारी १९२६- १४ऑगस्ट १९८४)जन्म महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील "गोळेश्वर" या एका छोट्याशा खेडेगावात गावात  एका दलित कुटुंबांत झाला होता. इतिहासात ते स्वतंत्र भारतातील पहिले क्रीडापटू म्हणून ओळखले जातात त्यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंम्पिकमध्ये फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात देशासाठी पहिलं वैयक्तिक कांस्यपदक जिंकलं होतं.खाशाबा जाधव यांना महाराष्ट्र सरकारचा मरणोत्तर छत्रपती पुरस्कार (१९९२-९३)आणि केंद्र सरकारचा अर्जुन पुरस्कार (२०००) मिळालाआहे.याशिवाय २०१०मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या काॅमनवेल्थ गेम्सच्या कुस्ती मार्गाला त्यांचं नाव देण्यात आलं होतं; म्हणून 
       विद्यार्थी मित्रांनो जीवनात शिक्षणासोबत मैदानी खेळ आत्मसात असेल तरच शारीरिक, बौद्धिक , मानसिक, भावनिक,क्षमता विकसित होतील व शारीरिक सुदृढतेसाठी आहार, व्यायाम, योगासन, ॲरोबिक्स, दोरी उड्या, लंगडी -लंगडी खेळ ॲथलेटिक्स मैदानी खेळ, सांघिकव वैयक्तिक खेळ,मनोरंजन खेळ,आरोग्य व शरीर संवर्धनशीलता,संयमीपणा, प्रामाणिकपणा, प्रेमळपणा, जिव्हाळाप्रिय, शिस्तबद्धपणा, कर्तव्यनिष्ठपणा, सामंजस्यपणा, दूरदृष्टी,व कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी, बहुभाषिक, आत्मविश्वास, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रप्रेम इत्यादी गुणवर्णन फक्त आणि फक्त खेळातून नैपुण्य मिळवता येतील उदा.कुस्तीगीर खाशाबा जाधव,हाॅकी खेलरत्न ध्यानचंद सिंग, धावपटू पी टी उषा ,मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर इ.खेळाडुंचे दाखले देत खेळाविषयीचे महत्त्व पटवून दिले 
     तद्नंतर कबड्डी व खो-खो खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यात 
पहिला गट - इयत्ता ५वी ते ७वी (मुले-मुली ),
दुसरा गट - इयत्ता ८वी ते ९वी (मुले-मुली) अशा गटा-गटात स्पर्धा घेण्यात आल्या यात विजयी व उपविजेता या सर्व संघांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक आबासाहेब व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी कौतुकास्पद अभिनंदन केले 
 तसेच स्पर्धा यशस्वीतेसाठी शिक्षक - 
श्री.पी.आर.पाटील,
श्री.एस.एस.पाटील,श्री.सी.जी वारुडे, श्री.एस.बी.भदाणे,आर.बी.गवळे, 
श्रीमती भारती मॅडम, महेश पाटील इ.शिक्षक- शिक्षकेत्तर सहकारी बंधू -भगिनींनी श्रम  घेऊन कार्यक्रमास आनंदाचा बहार आणला.
         यावेळी कार्यक्रमाचे 
सूत्रसंचालन-श्री एस बी भदाणे यांनी केले तर 
आभार प्रदर्शन -श्री.सी.जी.वारुडे(क्रीडा शिक्षक)
यांनी मानले व शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने करण्यात आला.

Post a Comment

0 Comments