शिंदखेडा, दि. १४ : शिंदखेडा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी श्री. उदय देसले व स्वीकृत नगरसेवकपदी श्री. अनिल वानखेडे यांची मंगळवारी निवड झाली. या ऐतिहासिक प्रसंगी पणन व राजशिष्टाचार मंत्री तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमारभाऊ रावल यांनी त्यांचा भव्य सत्कार करून अभिनंदन केले.शहरातील राजकीय नेत्यांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमात धुळे शहराचे आमदार मा. अनुपभैय्या अग्रवाल, आमदार मा. राम भदाणे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार मा. कुणाल पाटील, भाजपा धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी व जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील उपस्थित होते. या निवडीमुळे शिंदखेडा नगरपंचायतीला नवे ऊर्जावान नेतृत्व मिळाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये उत्साह आहे.
0 Comments